ETV Bharat / state

नागपुरात १० वर्षात पहिल्यांदा मान्सूनचे आगमन लांबणीवर

गेल्या २००९ मध्ये नागपुरात २६ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा तो रेकॉर्डदेखील मोडीत निघतो की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

फाईल फोटो
author img

By

Published : Jun 22, 2019, 11:33 AM IST

नागपूर - मृग नक्षत्र संपायला आले असताना अद्यापही पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे. गेल्या १० वर्षात मान्सूनच्या आगमनाला कधीही विलंब झालेला नाही. मात्र, यंदा वायू चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेला आहे.

नागपुरात १० वर्षात पहिल्यांदा मान्सूनचे आगमन लांबणीवर

पहिल्या पावसाच्या सरी आज कोसळतील या अपेक्षेने शेतकरी चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. त्यातच विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट झालेली आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने विदर्भातील बळीराजा बी-बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्राकडे फिरकला सुद्धा नाही.

सामान्यतः नागपूरसह विदर्भात पहिल्या पावसाच्या सरी १० जूनच्या दरम्यान कोसळतात. मात्र, गेल्या दशकभराच्या कालखंडात पावसाची सुरुवात १५ जून नंतरच होताना दिसत आहे. गेल्या १० वर्षात पावसाच्या आगमनाला इतका विलंब कधीही झालेला नाही. गेल्या २००९ मध्ये नागपुरात २६ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा तो रेकॉर्डदेखील मोडीत निघतो की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Intro:मृग नक्षत्र संपायला आला तरी पावसाची प्रतीक्षा अद्यापही सुरूच आहे....गेल्या 10 वर्षात मान्सूनच्या आगमनाला इतका विलंब कधीही झालेला नाही....मान्सूनला उशीर होत असल्याने पावसाळ्याचे दिवस देखील कमी होत आहेत,त्यामुळे हे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आहेत असं म्हंटल तरी चुकीचं ठरणार नाही

Body:पहिल्या पावसाच्या सरी आज कोसळतील या अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्रात एखाद्या चातक पक्षा प्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे....त्यातल्या त्यात विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट झालेली आहे ...पावसाचे आगमन लांबले असल्याने विदर्भातील बळीराजा तर बी- बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रा कडे फिरकत सुद्धा नाही आहे...गेल्या 10 वर्षात पावसाच्या आगमनाच्या इतका विलंब कधीही झाला आहे....2009 मध्ये केवळ 26 जून रोजी मान्सून चे आगमन नागपूरला झाले होते,यावर्षी तो देखील रेकॉर्ड मोडीत निघतोय की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे....सामान्यतः नागपूरसह विदर्भात पहिला पावसाच्या सारी ह्या 10 जूनच्या दरम्यान कोसळतात पण गेल्या दशकभराच्या कालखंडात पावसाची सुरवात ही 15 जून नंतरच होताना दिसत आहे....गेल्या 6 वर्षात तर पाऊस कधीही 19 जूनच्या आधी आलेलाच नाही...यावर्षी वायू वादळाचा फटका बसल्याने मान्सून लांबणीवर पडला आहे,त्यामुळे पावसाळ्याचे दिवस देखील कमी होत आहेत,त्यामुळे हे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम समोर येत आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.