नागपूर- सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान झाले. मात्र २०१४ च्या तुलनेत यावर्षीची मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे समजले आहे. या वर्षीचा मतदानाचा टक्का हा ५७.१९ % एवढा आहे. तर, २०१४ मधील मतदानाची टक्केवारी ही ६० टक्के एवढी होता. यातून मतदानाची टक्केवारी घसरल्याचे समजते आहे. त्यासाठी साप्ताहिक सुट्टी व पारंपरिक मतादारांची नाराजी ही जबाबदार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरवर्षी मतदानाचा टक्का घसरतांना दिसतो आहे. यावेळी मतदानाच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी आल्याने लोकांनी रविवार आणि सोमवार या दिवशी विकेंड सजरा करण्यावर भर दिला. त्याचबरोबर, पारंपरिक मतदारामुळे देखील मतदानाच्या टक्केवारीला फटका बसल्याचे समजले आहे. आपण मतदान केलेला उमेदवार निवडून येत नाही या विचाराने काँग्रेसचे पारंपारिक मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाही. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडला आहे. याची दखल काँग्रेस पक्षानी घेतली पाहिजे. तसेच श्रीमंत वर्ग देखील मतदानासाठी बाहेर न पडता सुट्टी साजरी करतात, असे मत राजकीय विश्लेषकांनी दिले आहे.
हेही वाचा- नागपुरात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क