ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू - election voting news

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा आणि सावनेर तालुक्यातील जटा मखोरा ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळीकला ग्रामपंचायत निवडणूक मतदान यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता 127 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या 1181 जागांसाठी 2798 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नागपूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरू

author img

By

Published : Jan 15, 2021, 10:37 AM IST

नागपूर - जिल्ह्यात 130 पैकी 127 ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक होत आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा आणि सावनेर तालुक्यातील जटा मखोरा ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळीकला ग्रामपंचायत निवडणूक मतदान यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता 127 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या 1181 जागांसाठी 2798 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात 1473 महिला तर 1313 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 505 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यात 2 लाख 91 हजार 87 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

नागपूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरू
सामाजिक अंतर राखून मतदान कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी येत असलेल्या मतदारांना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे. मतदान केंद्रावर तैनात असलेले पोलीस कर्मचारी आणि अधिकारी काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्तग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान गोंधळ होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहे. मतदान केंद्रांसह गावांच्या प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे. त्यासाठी जिल्ह्यात 485 मतदान केंद्रांवर 100 पोलीस अधिकारी, 611 पोलीस कर्मचारी, 250 होम गार्ड तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एसआरपीएफच्या दोन कंपन्या , शीर्घ कृती दल आणि दंगा नियंत्रण पथक सज्ज आहेत.

हेही वाचा - कर्नाटकमध्ये डंपर-टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात, ११ ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.