ETV Bharat / state

वंजारी समाजाला आरक्षण वाढवून मिळावे, विनायक मेटेंची विधानपरिषदेत मागणी

आपल्या राज्यात आरक्षण वाढवायचे असेल, तर त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मागणी करावी लागेल. वंजारी आरक्षणाचा मुद्दा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे कधी पाठवणार? त्यानंतर कधीपर्यंत आरक्षण मिळणार? आणि हे सरकार खरेच आरक्षण देणार आहे का? असे सवाल विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले.

vanjari community reservation
विनायक मेटे
author img

By

Published : Dec 21, 2019, 12:50 PM IST

नागपूर - विधान परिषदेमध्ये विनायक मेटे आणि नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यामधील वंजारी समाजाला आरक्षण वाढवून मिळावे, असा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावे आणि ही मागणी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पाठवावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

विधानपरिषद सभागृहात बोलताना विनायक मेटे

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम वंजारी समाजाला आरक्षणाचा मुद्दा समोर आणला. यावेळी दिवंगत सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते. त्यांच्या सहकार्याने गोपीनाथ मुंडेंनी २ टक्के आरक्षण वंजारी समाजाला दिले. त्याचा फायदा बीड, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील समाजाला झाला. मात्र, २ टक्के आरक्षणावर त्यांचे समाधान झाले नाही. तरीही त्यांनी ते आरक्षण स्वीकारले. मात्र, सध्या त्यासाठी बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. आपल्या राज्यात आरक्षण वाढवायचे असेल, तर त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मागणी करावी लागेल. वंजारी आरक्षणाचा मुद्दा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे कधी पाठवणार? त्यानंतर कधीपर्यंत आरक्षण मिळणार? आणि हे सरकार खरच आरक्षण देणार आहे का? असे सवाल विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले.

Intro:विधान परिषदेमध्ये विनायक मेटे आणि नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यांमधील वंजारा समाजाला वाढीव आरक्षण मिळावे असा मुद्दा उपस्थित केला....दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दोन वंजारा समजला 2 टक्के आरक्षण मिळवून दिलं होत,मात्र आता परिस्थिती बदलली असल्याबे या आरक्षणात वाढ करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे विनायक मेटे म्हणाले आहेत....या संदर्भात सरकारकडे स्पष्ट मागणी आहे, मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावं आणि ही मागणी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पाठवावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे

बाईट- विनायक मेटेBody:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.