नागपूर - अंतराळ आणि अंतराळातील उपग्रह हे सगळं नागपूरकरांना आता चार चाकीवर बघायला मिळते, रमण विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या प्रदर्शनात. येथे मंगळयान, चंद्रयान असे अनेक विविध उपग्रहांचे मॉडेल प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले आहेत. अंतरिक्षातील विविध हालचाली, स्पेस टेक्नॉलॉजी आणि आजपर्यंत केलेली कामगिरी आणि मिळवलेले यश ही संपूर्ण माहिती या प्रदर्शनात दिली जाते.
हेही वाचा - नागपूर जिल्हा परिषदेसोबतच काँग्रेसचे मिशन महानगरपालिका..
भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशातील एकूण शंभर शहरांमध्ये अशी प्रदर्शने भरवण्यात आली. आजपर्यंत इस्रोने केलेल्या कामगिरीची माहिती विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये टेक्नोलॉजीबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 'स्पेस ऑन व्हील' या मोबाईल वाहन प्रदर्शनातूनही विद्यार्थ्यांना अंतरिक्षातील विविध माहिती देण्यात येत आहे.