नागपूर - विदर्भाचे वैभव असलेला गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नाव बदलून त्याला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने काढला आहे. या नावाला विरोध करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गिरीपेठ परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन निर्णयाची होळी करण्यात आली. वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्याचे नाव देण्याऐवजी विदर्भासाठी कार्य करण्याचे नाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गोरेवाडा प्राणी संग्रहालय नामांतर : वेगळ्या विदर्भाचा विरोध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास विरोध - Balasaheb Thackeray Zoological Park news
विदर्भाचे वैभव असलेला गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नाव बदलून त्याला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने काढला आहे. या नावाला विरोध करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गिरीपेठ परिसरात आंदोलन करण्यात आले.
![गोरेवाडा प्राणी संग्रहालय नामांतर : वेगळ्या विदर्भाचा विरोध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास विरोध Vidarbha Rajya Andolan Samiti on Nagpur Gorewada Zoo renamed as Balasaheb Thackeray Zoological Park](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10319302-465-10319302-1611191310705.jpg?imwidth=3840)
गोरेवाडा प्राणी संग्राहलय नामांतर : वेगळ्या विदर्भाचा विरोध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध
नागपूर - विदर्भाचे वैभव असलेला गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नाव बदलून त्याला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने काढला आहे. या नावाला विरोध करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गिरीपेठ परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन निर्णयाची होळी करण्यात आली. वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्याचे नाव देण्याऐवजी विदर्भासाठी कार्य करण्याचे नाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वेगळ्या विदर्भाचा विरोध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध
बाळासाहेबानी विदर्भाला विरोधच केला
बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला आहे. रामटेक येथील सभेत विदर्भाचा बॅकलॉक भरून निघाला नाही तर ते आंदोलनाचे नेतृत्व करतील अशा शब्द त्यांनी दिला होता. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते त्यावेळी वेगळा विदर्भ देण्यासाठी तयार असताना शिवसेनेने याला विरोध केला. यामुळे विदर्भ वेगळा होऊ शकला नसल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.नाव घ्यायचे झाले तर ज्यांनी आपल्या आयुष्यात विदर्भ वेगळा झाला पाहिजे यासाठी खर्ची घातले अशा जांबुवंतराव धोटे किंवा ज्यांनी विदर्भासाठी लढा दिला आहे असे उमेश चौबे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले तरी चालेल पण बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच विरोध करण्यात आला.