ETV Bharat / state

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सापडले वाहतूक कोंडीत; उड्डाणपुलाचे काम संथपणे सुरू असल्याने व्यक्त केली नाराजी

महत्वाचे म्हणजे ही वाहतूक कोंडी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार करण्यात येत असलेल्या पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम अतिशय संथपणे सुरू असल्यामुळे निर्माण होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

union minister nitin gadkari blocked in traffic jam
नितीन गडकरी सापडले वाहतूक कोंडीत
author img

By

Published : Jun 19, 2021, 10:19 AM IST

नागपूर - केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वाहतूक कोंडीला समोर जावे लागले आहे. मात्र, त्यांनी गाडीत बसून वाहतूक कोंडी फुटण्याची वाट न बघता ते थेट स्वतः गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मदत केली. चक्क नितीन गडकरी स्वतः वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

union minister nitin gadkari blocked in traffic jam nagpur
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

गडकरींची नाराजी -

ही वाहतूक कोंडी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार करण्यात येत असलेल्या पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम अतिशय संथपणे सुरू असल्यामुळे निर्माण होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यावतीने सीएसआर फंडमधून नागपूरच्या पारडी भागात असलेल्या भवानी हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाकरिता ते जात असताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

हेही वाचा - अमरावती : सुनील देशमुखांचा काँग्रेसी विचार संधीसाधू; भाजपाची टीका

पारडी उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करा -

पारडी उड्डाणपुलाचे काम अतिशय संथपणे सुरू असल्याने दररोज या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. शिवाय आठवडी बाजार असताना तर या मार्गाने जाणेदेखील कठीण असते. पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने अनेक अपघात झाले. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन गडकरी यांनी पारडी उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.