नागपूर - नागपुरात प्लाझ्माची मागणी वाढली आहे. अशात डॉ. हेडगेवार रक्तपेढीला प्लाझ्मा दान दाते देखील वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून दोन अतिरिक्त प्लाझ्मा अफेरेसिस मशीन डॉ. हेडगेवार रक्तपेढीला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - विदर्भाच्या मदतीला रेल्वेसह एअरफोर्सचा हातभार, ऑक्सिजन टँकर केले एअरलिफ्ट
सद्यस्थितीत कोरोनावरील उपचारांमध्ये प्रभावी प्लाझ्मा थेरपीसाठी मोठ्या प्रमाणावर प्लाझ्माची मागणी वाढली आहे. विदर्भातील सर्वांत जुन्या व जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीला दोन प्लाझ्मा अफेरेसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या रक्तपेढीकडे दररोज ७० ते ८० बॅग प्लाझ्माची मागणी आहे. एका मशीनद्वारे दिवसाला केवळ २० बॅग रक्त काढल्या जात आहे. या दोन प्लाझ्मा मशीन उपलब्ध असताना अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अतिरिक्त दोन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णांसाठी सुरक्षित व तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केलेला प्लाझ्मा कमी वेळात योग्य दरात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. मागील काही दिवसांत प्लाझ्माचा सुद्धा काळाबाजार होताना दिसून येत आहे. रुग्णाचा जीव वाचवण्याठी नागरिकांकडून मिळेल तेवढे पैसे मोजले जात आहेत. यामुळे या मशीन आणि पालझ्मा दात्यांच्या प्रयत्नामुळे दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - नागपुरात आशादायक चित्र, पाचव्या दिवशी बाधितांची संख्या घटून 4182 वर