ETV Bharat / state

Two Murders In Nagpur : नागपुरात १२ तासात दोन हत्या; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क - नागपूर शहर गुन्हेगारी

खून, बलात्कार, दरोडा, लूटमार यासह सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूर शहराची कायदा आणि सुव्यवस्था (Nagpur Law and Order) कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. गेल्या वर्षी उपराजधानी नागपूर शहरातील गुन्हेगारी (Nagpur Crime) आटोक्यात आली म्हणून पोलिसांनी स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत लोकांची वाह-वाह मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Murder by extramarital affair) मात्र, गेल्या बारा तासात शहरात दोन हत्येच्या घटना (Two murders in Nagpur) घडल्या आहेत. (Latest news from Nagpur)

Two Murders In Nagpur
मृतक
author img

By

Published : Jan 9, 2023, 5:24 PM IST

पोलीस आयुक्त खुनाच्या घटनेविषयी सांगताना

नागपूर : पहिल्या घटनेत गाडीचा धक्का लागला म्हणून एकाची हत्या (Two murders in Nagpur) करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत अवैध धंद्यात सहकारी असलेल्याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध (Murder by extramarital affair) असल्याच्या कारणावरून इसमाची गोळ्या घालून हत्या (murder by gun shooting) केली. (Latest news from Nagpur) दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू केला आहे. (Nagpur Crime)

चाकू मारून हत्या : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसांपासून नागपूर शहरात रक्तरंजित घटनांची यादी वाढताना दिसत आहे. आठ दिवसात चार हत्येच्या घटना घडल्या असून अवघ्या बारा तासात दोघांची हत्या झाली आहे. पहिली घटना कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. कळमनामधील गुलमोहरनगर येथे दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या. त्यामुळे निर्माण झालेल्या वादातून अजय ऊर्फ लक्ष्मी नारायण चंदानिया (२२) नामक तरुणाची हत्या झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी विनय साहू याच्या भाच्याचा वाढदिवस होता. त्याच्यासाठी तो केक आणण्यासाठी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अजयच्या दुचाकीसोबत त्याच्या दुचाकीची धडक झाली. दोघांच्या गाडीचे नुकसान झाले होते. मात्र, आरोपी अजयने विनय साहूकडे गाडीच्या नुकसानाची भरपाई मागितली. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी चिडलेल्या अजयने विनय साहूला मारहाण केली. दोघांमध्ये हाणामारी सुरू असताना विनयने अजयवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे अजय रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. ज्यामुळे काही वेळात त्याचा मृत्यू झाला.

अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या : नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरातील आरोपीच्या घरीच घडली आहे. अवैध धंद्यात सहकारी असलेल्या इसमाचे पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचा कारणावरून आरोपीने इसमाची गोळ्या घालून हत्या केली आहे. अविनाश अशोक घुमडे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ते दोघेही अवैध जुगार खेळण्यासह आणि गांजाची विक्री करायचे. तसेच सोबत राहायचे. मृतक आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्यबद्दल बोलल्याने झालेल्या वादातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने अविनाश अशोक घुमडेवर दोन गोळ्या झाडून हत्या केली. घटेनची माहीती समजताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि तपास सुरू केला आहे.

आठ दिवसात चार हत्या : नवीन वर्ष सुरू होऊन अवघ्या आठ दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. या आठ दिवसात नागपूर शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार हत्येच्या घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी पहिली हत्या नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी घडली होती. तर गेल्या 12 तास दोघांची हत्या झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.