ETV Bharat / state

सावनेर-पांढुर्णा मार्गावर चारचाकी उलटून दोघांचा मृत्यू, ७ जखमी - सावनेर

सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकीचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Dec 1, 2019, 1:31 PM IST

नागपूर - जिल्ह्याच्या सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी उलटून अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्वजण सावनेर येथील कापसाच्या जिनिंगमध्ये कामासाठी जात होते. चारचाकी वाहन छत्रापून शिवारात चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ती चारचाकी चार वेळा उलटली. मारोतराव सरयाम व विनोद भीमराव राऊत (दोघे रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींवर सावनेर येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून सर्वांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांनी लपवले फौजदारी गुन्हे, नागपूर न्यायलयाने बजावली नोटीस

Intro:नागपूर जिल्ह्याच्या सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रापूर शिवारातील एक वळणावर वेगात असलेल्या तवेरा गाडी वरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत... जखमींवर नागपूर च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत 
Body:सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रापूर शिवारातुन एक तवेरा गाडी वायू वेगाने जात असताना त्या गाडीच्या चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले... ज्यामुळे त्या तवेरा गाडीने चक्क चार वेळा पलटी मारली आणि शेवटी रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवरफेकल्या गेली..... या अपघातात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.... मृतकांमध्ये  मारोतराव परयाम आणि  विनोद राऊत यांचा समावेश असून ते मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्याचे रहिवासी आहेत...सावनेर येथील कापसाच्या जिनिंग मध्ये काम करण्यासाठी हे सर्व जात असताना हि दुर्दैवी घटना घडली आहे...या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारार्थ सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ,मात्र त्यातील काहींना जबर इजा झाली असल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर सर्वांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.