ETV Bharat / state

Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनात बारा विधेयके मंजूर; दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज - हिवाळी अधिवेश

दोन वर्षानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे ( Winter session 2022 End ) आज सूप वाजले. यावेळेस विधानसभा कामकाजाचा आढावा घेतला असता, दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज झाले. यामध्ये लक्षवेधी, तारांकित प्रश्न यासह बारा विधेयक मंजूर ( Twelve bills passed in winter session ) झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) दिली.

Winter Session
Winter Session
author img

By

Published : Dec 30, 2022, 10:45 PM IST

Updated : Dec 30, 2022, 11:02 PM IST

हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद

नागपूर - नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे ( winter session 2022 ) कामकाज आज संपले. गेल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या कामकाजाचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) यांनी घेतला. यात दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज झाले. यामध्ये लक्षवेधी, तारांकित प्रश्न यासह बारा विधेयक मंजूर ( Twelve bills passed in winter session ) झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) दिली.

हिवाळी अधिवेशनातदहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज

विधानसभेतील कामकाज - विधानसभेचे कामकाज दहा बैठकांमध्ये झाले. यामध्ये ८४ तास दहा मिनिटांचे प्रत्यक्ष कामकाज झाले असून विविध कारणांमुळे सभागृहाचा आठ तास 32 मिनिटे इतका वेळ वाया गेला आहे. या काळात दररोज सरासरी आठ तास 25 मिनिटे इतके कामकाज झाले. सभागृहातील महत्त्वाचे आयुध मानले जाणारे तारांकित प्रश्न हे सभागृहात सहा हजार 846 इतके प्राप्त झाले. यापैकी 422 प्रश्न स्वीकृत करण्यात आले तर, 36 प्रश्नांना उत्तरे देण्यात आल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली. लक्षवेधी सभागृहात मांडण्यात येतात. ज्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात यावेळी २०२८ लक्षवेधी सभागृहाकडे आल्या. यापैकी 333 लक्षवेधी स्वीकारण्यात आल्या तर, 106 लक्षवेधींवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वात जास्त लक्षवेधींवर चर्चा झाल्याची बाब समोर आली.

अल्प सूचना आणि इतर काम - अल्पसूचना सभागृहाला सहा दाखल झाल्या त्यापैकी एक स्वीकारण्यात आली. एकाच अल्प सूचनेवर चर्चा करण्यात आली. नियम 97 अन्वये सभागृहाकडे सूचना चर्चेसाठी येत असतात. यात 53 सूचना सभागृहाला प्राप्त झाल्या मात्र यातल्या एकाही सूचनेवर चर्चा झाली नाही.

शासकीय विधेयके - बारा शासकीय परिस्थितीत विधेयके मांडण्यात आली. यातील बारा विधेयके संमत करण्यात आली. तर, विधान परिषदेने तीन विधेयके संमत केली. पाच अशासकीय विधेयके प्राप्त झाली. त्यातील दोन विधेयके मान्य करण्यात आली. शासकीय दोन ठराव प्राप्त झाले. त्यापैकी दोन ठराव मान्य करण्यात आले. त्यावर चर्चा करण्यात आली.

नियम 293 अन्वये प्रस्ताव - नियम 293 अन्वये तातडीच्या विषयावर स्थगन प्रस्ताव सभागृहात आणण्याचे आयुध मानले जाते. यापैकी तीन सूचना मान्य करण्यात आल्या. या तीनही सूचनांवर चर्चा करण्यात आली. प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या अर्धा तास चर्चा या 15 होत्या. त्यापैकी आठ मान्य करण्यात आल्या. त्यातील दोन वर चर्चा करण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत - अनेक मुद्यांनी गाजलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचे आज अखेर सूप वाजले असून पुढील अधिवेशन मुंबईत २७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दोन आठवड्यांच्या अधिवेशनात विधान परिषदेत झालेल्या लक्षवेधी, विधेयक आणि विविध तारांकित प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावेळी धुमश्चक्री पाहायला मिळाली.

सभागृहातील सदस्यांची उपस्थिती 50.57% - सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर 181 सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 48 सूचना स्वीकृत करण्यात आल्या. तर चार सूचनांवर केवळ चर्चा करण्यात आली. 286 अशासकीय ठराव सूचना सभागृहाला प्राप्त झाल्या. त्यापैकी 208 सूचना मान्य करण्यात आल्या. मात्र, एकाही सूचनेवर चर्चा झाली नाही. दोन अभिनंदनपर सूचना आल्या त्यापैकी एक प्राप्त करण्यात आली, तर एक अमान्य करण्यात आली. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात सभागृहातील सदस्यांची उपस्थिती कमाल उपस्थिती 91.32% इतकी होती. तर, कमीत कमी उपस्थिती 50.57% इतकी होती. एकूण सरासरी उपस्थिती 79.83% इतकी होती. दरम्यान विधिमंडळाचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा यावेळी विधानसभा अध्यक्षांनी केली.

हिवाळी अधिवेशन 2022 - विधेयकांची माहिती -
दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके 12
विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके 03

दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके -
(1) मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्र. 12 चे

रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास

विभाग)

(2) महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा

अध्यादेश क्र.11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणुकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा)

(सहकार व पणन विभाग)

(3) जे.एस.पी.एम. युनिव्हर्सिटी विधेयक, 2022 (नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन

करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

(4) महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग)

(5) पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन

करणेबाबत) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(6) युनिवर्सल ए. आय. विद्यापीठ, कर्जत विधेयक, 2022 (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ

स्थापन करणेबाबत) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(7) उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे (सुधारणा) विधेयक, 2022

(नगर विकास विभाग)

(8) महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती (सुधारणा) विधेयक,

2022 (सामान्य प्रशासन विभाग)

(9) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय

(विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022, (सन 2022 चा

अध्यादेश क्र. 13 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूंची

नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूद विद्यापीठ अनुदान

आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(10) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा

अध्यादेश क्र. 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्येत बदल करणेबाबत)

(ग्रामविकास विभाग)

(11) महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा (विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या

तरतुदीमध्ये बदल करणेबाबत) (गृह विभाग)

(12) आय.टी.एम. कौशल्य विद्यापीठ विधेयक, 2022 (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन

करणेबाबत) (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)

विधान परिषदेत प्रलंबित

(1) महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतुदींमध्ये बदल करणेबाबत)

(उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)

(2) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(3) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)

Last Updated : Dec 30, 2022, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.