नागपूर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. प्रचार सभा सोबतच बाईक रॅलीने देखील मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रचार केला जात आहे. मात्र, या बाईक रॅलीमध्ये सहभागी असलेल्या एकाही कार्यकर्त्याने हेल्मेट घातलेले नव्हते.
हेही वाचा - धक्कादायक.. भाजपनंतर आता काँग्रेसचा 'टी शर्ट' घालून तरुणाची आत्महत्या
वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. मग प्रचार करणाऱ्यांना वाहतुकीचे नियम नाहीत काय? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये आहे.
बाईक रॅलीच्या प्रचाराकरिता आधीच परवानगी घ्यावी लागते. तसेच जे वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत अशांवर कारवाई केली जाते, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.