नागपूर : आठ दिवसांपूर्वी नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहन बिऱ्हाडे नामक तरुणाची हत्या (Roham Birhade Murder Case) झाली होती. हत्या प्रकरणात पोलिसांनी बाबू बकरी उर्फ वीरेंद्र रामगडिया, अश्विन उर्फ गुड इंदूरकर आणि येशुदास उर्फ शँकी परमार या तीन आरोपींना पोलिसांनी अटक (three accused arrested in murder case) केली होती. त्यापैकी एका आरोपीचा व्हिडीओ वायरल होत आहे. ज्यामध्ये तो आज जेल, कल बेल आणि त्यानंतर तोच जुना खेळ असे म्हणताना व्हिडीओमध्ये (today Jail tomorrow bell viral Video) दिसून येत आहे. एवढंच नाही तर जेलमधून बाहेर आल्यानंतर 50 लाखांची टीप मिळणार असल्याचा संवाद या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. Roham Birhade massacre Nagpur, Latest news from Nagpur, Nagpur crime, Video viral Nagpur murder accused
अच्छीचा तो व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल - 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्री उशिरा पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग येथे रोहन शंकर बिहाडे (२२) नामक तरुणाची तिघांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच बाबू बकरी उर्फ वीरेंद्र रामगडिया, अश्विन उर्फ गुड इंदूरकर आणि येशुदास उर्फ शँकी परमार या तीन आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या तिघांना न्यायालयात हजर केले त्यावेळी आरोपींचे काही साथीदार देखील तिथे भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी एकाने अश्विन उर्फ अच्छी त्याचा आवडता डायलॉग बोलला. तेव्हा त्याच्या साथीदाराने तो डायलॉग मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉड केला आणि वायरल केला आहे. हा व्हिडीओ इतका वेगात वायरल झाला की, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओ वायरल - लष्करीबाग भागात टोळीयुद्धातूनंच रोहन बिऱ्हाडे नावाच्या गुन्हेगाराची अतिशय निर्घृण हत्या झाली होती. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बाबू बकरी उर्फ वीरेंद्र रामगडिया, अश्विन उर्फ गुड इंदूरकर आणि येशुदास उर्फ शँकी परमार यांनी रोहनची हत्या केली. तीनही आरोपी जेलमध्ये असताना त्यांची दहशत कमी होऊ नये यासाठी हा व्हिडीओ वायरल केल्याचं बोललं जात आहे.
50 लाखांची टीप - आज जेल,कल बेल फिर वही पुरणा खेल असं आरोपीने डायलॉग दिल्यानंतर आणखी एक वाक्य तो बोलला ज्यामध्ये 50 लाखांची टीप असल्याचं रेकॉड झालं आहे. त्याच वेळी अश्विनचे साथीदार त्याच्यासाठी खर्राची व्यवस्था करू का अशी विचारणा करताना दिसत आहे,त्यावेळी एकही पोलीस अधिकारी किव्हा कर्मचारी या गुंडांना हटकत नसल्याचं देखील दिसून येत आहे.
विरोधी टोळीला इशारा - मृतक रोहन लष्करी भागातील गुन्हेगार सौरभ वासनिक टोळीचा सदस्य होता. बाबू बकरी त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतानाही पोलिसांनी सौरभवर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तुरुंगात टाकले.सौरभ वासनिक तुरुंगात गेला त्यामुळे आरोपींनी रोहनची हत्या केली.त्यानंतर
हा व्हिडिओ वायरल करून विरोधी टोळीला इशारा दिला असल्याचं बोललं जातं आहे.