नागपूर - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतर विमानातून खाली उतरावे लागले. यावर बोलताना हे तांत्रिक कारणांनी घडले असेल. पण मागील वर्षभरात राज्यपालांचा कार्यकाळ पाहता, ते भाजपचे प्रवक्ते आहे की राज्यपाल हेच कळत नाही, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
हे काही शाळेतील मुलांचे भांडण नाही -
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची वर्षभरातील भूमिका बघितली, तर राज्यपाल सारख्या महत्त्वाच्या पदाचे गांभीर्य कमी होते, अशी परिस्थिती झाली आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. घटनेने राज्यपाल पदाला ही गरिमा मिळून दिली आहे. यामुळे हे वैभव गमावू नका, अशी विनंतीही राज्यपालांना करतो, असेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यसरकारने मुद्दाम केले म्हणायला हे काही शाळेतील मुलांचे भांडण नाही, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.