ETV Bharat / state

मिहानमध्ये वाघ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमधील लपंडाव सुरूच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - नागपूर वनविभाग

गेल्या 15 दिवसांपासून वाघाने नागपूरलगत मिहान औद्योगिक क्षेत्रासह आसपासच्या परिसरात दहशत निर्माण केली आहे. वनविभागाच्या पथकाचे प्रयत्न सुरू असून त्यांनी लावलेल्या ४० ट्रॅप कॅमेऱ्यांपैकी एका कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे.

nagpur
मिहानमध्ये वाघाची दहशत
author img

By

Published : Dec 1, 2019, 3:16 PM IST

नागपूर - गेल्या 15 दिवसांपासून नागपूर शहराशेजारी असलेल्या मिहान औद्योगिक क्षेत्रासह आजू-बाजूच्या परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या दहशतीमुळे गावकरी, शेतकरी आणि औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा वाघ गेल्या 15 दिवसांपासून वनविभागाच्या पथकाशी लपंडाव करत आल्याने रविवारी सकाळपासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या शोधासाठी पुन्हा मोहीम सुरू केली आहे.

मिहानमध्ये वाघाची दहशत

नागपूरलगतच्या मिहानमध्ये वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाने परिसरात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला होता. यामुळे वाघ आपल्या परिसरात असल्याच्या चर्चेने अनेकांच्या मनात भीती भरली आहे. गेल्या १५ दिवसांपासून शोध सुरू असतानासुद्धा वाघ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अद्याप गवसलेला नाही. याउलट तो २९ नोव्हेंबरला मिहानमधील इन्फोसिस कंपनीच्या मागील भागात असलेल्या कालव्याजवळ लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप झाला होता. त्यापूर्वी बुधवारी २७ नोव्हेंबरच्या रात्री इन्फोसिस कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो आढळून आला होता. मिहान प्रकल्पात अनेक मोठ्या औद्योगिक कंपनी आणि वसाहती असल्याने अनेकजण रोजगाराच्या निमित्ताने या भागात वास्तव्यास आहेत. मात्र, आता वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून कामगारांना रात्रीच्या वेळी एकटे न फिरण्याच्या सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - नागपुरात शिक्षणातील शुल्कवाढ, खाजगीकरणाच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर

हेही वाचा - खासदार महोत्सवात ८०० कलाकारांनी नृत्य, वादन आणि गायनासह सादर केली कला

वन विभागाने या ठिकाणी आपली सुरक्षा लावली असून जवळपास ४० ठिकाणी वाघाला ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावले आहेत. यापैकी एका कॅमेऱ्यात वाघ ट्रॅप झाला होता मात्र, त्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश मिळू शकले नाही. यातच काही लोकांनी वाघ बघितल्याचे सांगितले, तर काही त्याबाबत चर्चा करत आहेत. वन विभागाचे कर्मचारी आपल्या पथकासह शोध मोहीम राबवत असून काही ठिकाणी वाघाचे पायाचे ठसेसुद्धा मिळाले आहेत. त्या दृष्टिकोनातून वन विभागाने आपले जाळ टाकायला सुरुवात केली आहे. तसेच वन विभागाचे कर्मचारी या परिसरात रात्रंदिवस गस्तही घालत आहेत.

हेही वाचा - राम मंदिर निर्माण समितीत मी सहभागी नाही - श्री श्री रविशंकर

Intro:गेल्या 15 दिवसांपासून नागपूर शहाराच्या शेजारी असलेल्या मिहान औद्योगिक क्षेत्रासह आजू-बाजूच्या परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली आहे.... वाघाच्या दहशती मुळे गावकरी, शेतकरी आणि औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीच्या वातावरणात तयार झाले आहे...वाघोबा गेल्या 15 दिवसांपासून वनविभागाच्या पथकाशी लपंडाव करत आल्याने रविवारी सकाळपासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या शोधासाठी पुन्हा मोहीम सुरू केली आहे Body:मिहानमध्ये वाघाचा वावर असल्याचं स्पष्ट झाल्याबतर वनविभागाने परिसरात लावलेल्या कॅमेऱ्या मध्ये वाघ ट्रॅप झाला होता....वाघ आपल्या परिसरात असल्याचे एकूण तर अनेकांच्या मनात भीती भरलेली आहे...वनविभागाने सुद्धा या संदर्भांत सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना केल्या आहेत...गेली 15 दिवसांपासून वाघाचा शोध सुरू असताना सुद्धा वाघ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अजूनही गावसलेला नाही तर या उलट वाघ २९ नोव्हेंबरला मिहानमधील इन्फोसिस कंपनीच्या मागील भागात असलेल्या नहराजवळ लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला होता,त्यापूर्वी बुधवारी २७ नोव्हेंबरच्या रात्री इन्फोसिस कंपनीच्या सीसीटीवी फुटेजमध्येही तो आला होता....मिहान प्रकल्पात अनेक मोठ्या औद्योगिक कंपनी आणि वसाहती आहे...त्यामुळे अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने या भागात वास्तवास आहेत...या भागात वाघ असल्याची दहशत आहे .... त्यामुळे मुळे इथले नागरिक दहशतीत जगत आहे , या ठिकाणी येणाऱ्या कामगारांना रात्रीच्या वेळी एकटे न फिरण्याच्या सूचना वनविभागा कडून देण्यात आल्या आहेत..
वन विभागाने या ठिकाणी आपली सुरक्षा लावली जवळपास 40 ठिकाणी वाघाला ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावले या पैकी एका कॅमेऱ्यात वाघ ट्रॅप झाला यावरून या परिसरात वाघाची उपस्थिती आहे हे निश्चित झालं आहे मात्र त्याच ठिकाणी अजून मिळून आलं नाही .. वाघ फिरत आहे मात्र तो दिसून येत नाही काही लोकांनी वाघ बघितल्याच सांगितलं तर काही त्याची चर्चा करत आहे .. वन विभागाचे कर्मचारी आपल्या टीम सह या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आहे .. तर काही ठिकाणी वाघाचे पगमार्क सुद्धा मिळाले त्या दृष्टिकोनातून वन विभागाने आपलं जाळ टाकायला सुरवात केली आहे .. वन विभागाचे कर्मचारी या परिसरात रात्रंदिवस गस्त घालत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.