नागपूर : यावर्षी नागपूर शहरात हत्येच्या घटनांमध्ये 33 टक्यांची घट असल्याचा दावा नागपूर शहराचे पोलीस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. मात्र, गेल्या 24 तासात शहरात दोघांची हत्या झाल्याने त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले (Three murder in different incidents in Nagpur) आहेत. तिसरी हत्येची घटना नागपूर ग्रामीणच्या बुटीबोरी येथे घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली तर तिसरी घटना जिल्ह्यातील बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नामक इसमाची हत्या केली. महत्वाचे म्हणजे तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले (Three murder in Nagpur in 24 hours) आहे.
हत्येची पहिली घटना : नागपूरच्या इमामवाडा भागात घडली आहे. दोघांनी मिळून एकाची हत्या केली आहे. रामसिंग ठाकूर असे मृतक इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतक रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली (Three murder in Nagpur) आहे.
हत्येची दुसरी घटना : ही पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोशन शंकर बिहाडे (२२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास तिघांनी चाकु आणि लोखंडी रोड रोशनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोशनचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वीरेंद्र उर्फ बाबू बकरी, यशोदास उर्फ सॅनकी आणि अश्विन या तिघांसोबत रोशनचा तिघांसोबत वाद सुरू होता. त्याच वादातून तिघांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली (accused arrested) आहे.
हत्येची तिसरी घटना : ही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात झाली आहे. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्याची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नाव असून पोलिसांनी त्यांना अटक केली (Nagpur Crime) आहे.