ETV Bharat / state

Adulterating Grains : गरिबांचे धान्य चोरून इतर धान्यात भेसळ करणाऱ्या तिघांना अटक, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेले सर्व धान्य गोंदिया जिल्ह्यातील एका राईस मीलमध्ये भेसळ ( Three Arrested for Adulterating Grains ) करण्यासाठी जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजली होती.

नागपूर
Adulterating Grains
author img

By

Published : Jan 7, 2022, 6:50 AM IST

नागपूर - काही राज्यांमध्ये गोर-गरीब आणि गरजू कुटुंबांना वितरित करण्यात येणारे रेशनचे धान्याची विक्री करणाऱ्या टोळीचा ( Three Arrested for Adulterating Grains ) पर्दाफाश झाला आहे. नागपूर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेले सर्व धान्य गोंदिया जिल्ह्यातील एका राईस मीलमध्ये भेसळ करण्यासाठी जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजली होती. त्यांच्याआधारे पोलिसांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणात तांदळाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी गोडावूनमधून जप्त केलेल्या पोत्यांवर महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा येथे वितरित केला जाणार होता.

रेशनचा तांदूळ जप्त

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिसांना त्यांच्या गुप्तहेरांकडून माहिती समजली होती की रेशनच्या दुकानांमध्ये वितरित होणारे धान्य दुसऱ्या पोत्यांमध्ये भरले जात आहे. हा तांदूळ भेसळ करण्यासाठी गोंदिया येथे पाठवले जाणार आहे. त्यानंतर भेसळ युक्त तांदूळ बाजारात विकला जाईल. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिघोरी पुलाजवळ असलेल्या गोडाऊनवर धाड टाकली. त्यावेळेस एका ट्रक मध्ये हे तांदूळ भरले जात होते. ट्रक मध्ये 400 पोती माल भरला होता तर गोडाऊन मध्ये 490 पोती माल आढळून आला. पोलिसांनी 50 किलो वजनाचे एकूण 890 पोती जप्त केले आहेत. शिवाय एक ट्रक आणि टेम्पो सुद्धा पोलिसांनी जप्त केलेला आहे

चार राज्यातील धान्य -

पोलिसांनी धाड टाकून जप्त केलेला तांदूळ हा महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा येथे वितरित केला जाणार होता. रेशन दुकानात वितरण करण्यासाठी निघालेले धान्याचे काही आरोपी ट्रक चालक तस्करांच्या मदतीने हेराफेरी करत होते. तर ज्या ग्राहकांनी सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानांमधून धान्य खरेदी केलेलं आहे. त्यांच्याकडून कमी किमतींत सुद्धा तस्कर धान्य खरेदी करतात. त्यानंतर ते धान्य उच्च प्रतीच्या धान्यात भेसळ करून विकत असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईची संपूर्ण माहिती अन्न प्रशासन विभागाला देण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रॅक आणि धान्य मिळून 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा - Covid Outbreak In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक.. 24 तासांत 36 हजार जण पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.