ETV Bharat / state

Nagpur Crime News: कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये माळी पदावर नियुक्तीसाठी दोन लाखांची मागणी; तीन आरोपींना भरतीसाठी लाच घेताना अटक - सफाई कामगाराला अटक

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये माळी या पदावर नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची लाच घेताना तिघांना अटक केली आहे. सीबीआयच्या पथकाने भरतीशी संबंधित लाच प्रकरणात कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड (केसीबी), नागपूर (महाराष्ट्र) या सफाई कामगाराला अटक केली आहे. याशिवाय कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या उमेदवारासह नर्सरी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

Nagpur Crime News
लाच घेताना अटक
author img

By

Published : Apr 20, 2023, 10:43 AM IST

नागपूर : अटक करण्यात आलेले आरोपी एका खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून भरतीचे रॅकेट चालवत असल्याचा खुलासा झाला आहे. त्या अटक केलेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सहाय्यक शिक्षक हा माळी व सफाई कामगार या पदावर भरती करण्याचे आश्वासन देऊन उमेदवारांकडून लाखो रुपये उकळत होता. या संपूर्ण गैरव्यवहारासंदर्भात माहिती समजल्यानंतर सीबीआयच्या पथकाने धाड टाकून तिघांना अटक केली आहे.

'असा' सुरू होता घोटाळा : या भरती घोटाळ्यातील तीनही आरोपी भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना गुप्तपणे संपर्क साधत होते. त्यापैकी एकाने यासंदर्भात तक्रार सीबीआयकडे दिली. आरोपी उमेदवाराची निवड निश्चित करण्यासाठी अकरा लाख रुपये भरावे लागतील, सुरुवातीला 50 हजार रुपये घेतले जात होते. अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयच्या पथकाने सापळा रचून उर्वरित रकमेतील दोन लाख रुपये घेताना तिघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

दलालामार्फत प्रमाणात रक्कम वसूल : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्धा येथील उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह एका खासगी इसमाला २० हजार रुपयांची लाच घेताना फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी हे स्वस्त धान्य दुकानदारांकडून आपल्या दलालामार्फत मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करत होते. मोठे पदस्थ अधिकारीच लाच घेत होते, त्यामुळे हा जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला होता.

उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेत असताना रंगेहात अटक : बुलढाणा जिल्ह्यातही डिसेंबरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेत असताना रंगेहात अटक करण्यात आली होती. बुलढाण्याचे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना शेतकऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली होती. हिंगणा इसापूर येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडीलांची जमीन ही जिगाव या प्रकल्पामध्ये भूसंपादीत करण्यात आली होती. शेतकऱ्याकडे भूसंपादन विभागाची चुक दुरुस्त करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा : Wardha Crime: जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह अन्य एकाला वीस हजारांची लाच घेताना अटक; नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.