ETV Bharat / state

नागपुरात 12 ते 18 वर्षाच्या 40 जणांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी

लहान मुलांना लस देण्यासाठी पालक घेऊन आले होते. यावेळी त्यांना व्हिडिओ कंसेंट घेऊन कागपत्राची प्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये 40 मुलांना पहिला डोस दिला असून साधारण 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. यानंतर अधून-मधून त्यांच्या तपासणी चाचण्या सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. साधारण 208 दिवस म्हणजे 7 महिन्याच्या प्रक्रियेतून त्यांना जावे लागणार आहे.

कोवॅक्सिनचा पहिला डोस
नागपुरात 12 ते 18 वर्षाच्या 40 जणांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी
author img

By

Published : Jun 6, 2021, 10:21 PM IST

Updated : Jun 7, 2021, 1:30 PM IST

नागपूर - नागपुरातील मेडीट्रीना हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली. यामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. कोवॅक्सिन चाचणीचा पहिला डोस महालमध्ये राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलाला देण्यात आला आहे. यात एकुण 40 मुलांची चाचणी करून त्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

लहान मुलांना लस देण्यासाठी पालक घेऊन आले होते. यावेळी त्यांना व्हिडिओ कंसेंट घेऊन कागपत्राची प्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये 40 मुलांना पहिला डोस दिला असून साधारण 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. यानंतर अधून-मधून त्यांच्या तपासणी चाचण्या सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. साधारण 208 दिवस म्हणजे 7 महिन्याच्या प्रक्रियेतून त्यांना जावे लागणार आहे. त्यानंतर सकारात्मक अहवाल आल्यास भारतीय औषध महानियंत्रक (डिसीजीआय)ची परवानगी मिळताच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार आहे.

नागपुरात 12 ते 18 वर्षाच्या 40 जणांना कोवॅक्सिनचा पहिला डोस

नवीन वर्षात लसी मिळण्याची शक्यता -

भारतीय बनावटीचे भारत बायोटेकचे कोवॅक्सिन लस हे लहान मुलांची ट्रायल या वर्षात डिसेंबर 2021 पर्यंत संपणार अशी शक्यता आहे. जानेवारी 2022 मध्ये नवीन वर्षात लहान मुलांची लस बाजारात उपलब्ध होणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

18 टक्के मुलांची अँटिबॉडी पॉझिटिव्ह -

यामध्ये साधारण 50 मुलांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी 9 मुलांची अँटीबीडीज पॉझिटिव्ह असल्याचे परीक्षणात पुढे आले. म्हणजेच या मुलाला कोरोना झाला होता. पण त्यांना लक्षणे दिसले नाही. त्यांच्यावर कोरोनाच्या परिणाम न होता हर्ड इम्युनिटी तयार झाली असल्याचे महत्वाची बाब निदर्शनास आली. विशेष म्हणजे या मुलाना कोरोना झाल्याचे त्यांचा आई-वडिलांना सुद्धा माहित पडले नव्हते. पण या चाचणीसाठी कोरोना झालेल्या मुलांची निवड बाद ठरवण्यात आली. या तपासणीत केवळ 40 मुलांची निवड झाली. जे या चाचणीच्या अटीआ शर्तीत योग्य ठरलेत.

औषध आणि डोसचे असे असणार प्रमाण -

भारत बायोटेकच्या 18 वर्षावरील लसीचा यशस्वी चाचणी नंतर लहान मुलांमध्ये चाचणी केली जात आहे. यात प्रक्रियेतून पूर्ण झालेले वॅक्सिन असून 0.5 मिली वॅक्सिनचा डोस लहान मुलांना देण्यात आला आहे. हे यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. जेव्हा मोठ्या वर्गात लस देताना ताप याव्यतिरिक्त कुठलेच अतिरिक्त परिणाम दिसून आले नाही. यानंतर येत्या पाच ते सहा दिवसात दुसरा गट म्हणजेच 6 ते 12 आणि त्यानंतर 6 गटात प्रक्रिया पूर्ण करून चाचणीचे ट्रायल होणार आहे.

Last Updated : Jun 7, 2021, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.