नागपूर - विदर्भातील तापमान यावर्षी नवीन रेकॉर्ड बनवेल, अशी परिस्थिती यावर्षी आहे. एप्रिल महिना संपण्यापूर्वीच तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं संपूर्ण नागपूरकर हावलदिल झाले आहेत. पंरतु उन्हाने हवालदिल झालेल्या नागपुरकरांना सिग्नलवर पाणी वाटप केल जात आहे. याचा आढावा घेतलायं ईटीव्ही भारतचे प्रतिनीधींनी धनंजय टिपले यांनी.
कितीही ऊन असले तरी अनेकांना घराबाहेर पडणे अपरिहार्य आहे. परंतु अंगाची लाहीलाही होणाऱ्या नागपूरकरांच्या मदतीसाठी काही सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. नागपूरच्या मुख्य मार्गांवरील चौकात सिग्नलवर थांबणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रखर उन्हात स्वयंसेवक प्रवाशांना पाणी पाजून त्यांची तहान भागवत आहेत. यातून या संस्था आणि हे स्वयंसेवक आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत.