नागपूर - ढगाळ वातावरण पूर्णपणे संपले असून आकाश निळे-शुभ्र झाले असल्याने आता नागपूरसह विदर्भात पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले आहे. तर, शनिवार रात्रीपासूनच गारठा वाढला असल्याने पुढील दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच दमदार पावसाचे आगमन झाले होते. नागपूरसहित विदर्भात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. शेतातील संत्रा, गहू, चना, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता मात्र, पावसाने उसंत घेतली असून ४ दिवसानंतर अखेर शनिवारी नागपूरकरांना सूर्याचे दर्शन झाले.
हेही वाचा - राज्यात ३ पक्षांचे सरकार, मोठे निर्णय घ्यायला वेळ लागणारच
३ दिवसांच्या पावसानंतर शनिवारी रात्रीपासूनच हुडहुडी वाढली आहे. तर, रविवारीची सकाळ गारठा वाढवणारी आहे. पुढचे काही दिवस पारा असाच घसरणार असून १० अंशापेक्षा खाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे २७ डिसेंबर रोजी नागपुरात तापमान ५.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.
हेही वाचा - काँग्रेसच्या मंत्र्यांची खाती निश्चित; उर्जा खात्याविषयी काय म्हणाले नितीन राऊत?