नागपूर - अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परिक्षेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. नागपूर विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या परिक्षेतही तांत्रिक अडचणी सुरूच आहेत. परिक्षा अॅपवर वेळापत्रक चूकीचे दाखवले जात आहे. त्यामुळे आधीच गोंधळलेला विद्यार्थी अधिक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय विद्यापीठ हेल्पलाईनला याबाबत विचारणाही विद्यार्थ्यांकडून केली जात आहेत. मात्र तिथून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तांत्रिक अडचणींचा सामना
'होणार.. नाही होणार' म्हणत अंतिम वर्षाच्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार परिक्षेलाही सुरूवात करण्यात आली. परंतु अनेक विद्यापीठांमध्ये परिक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी येतच असल्याचे दिसून येत आहे. नागपूर विद्यापीठाकडूनही घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षाच्या परिक्षेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी सर्वरमुळे विद्यार्थ्यांना परिक्षेला मुकावे लागत आहे. तर कधी परिक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. याही पलिकडे आता नागपूर विद्यापीठाच्या परिक्षा अॅपवर वेळापत्रकच चूकीचे दाखवले जात आहे.
अचानक येणाऱ्या समस्येची विद्यार्थ्यांमध्ये धास्ती -
विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात आणि अॅपवरिल वेळापत्रकात चूकीच्या तारखा दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय ठरलेल्या तारखे पूर्वीच परिक्षा अॅपवर, संबंधित विभागाच्या परिक्षा दाखवत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच परिक्षा सुरू असताना अचानक सर्वर सारख्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे.
काय आहे परिक्षा विभागाचे म्हणणे?
विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या या सर्व समस्यांबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले परिक्षेपूर्वी व परिक्षे दरम्यान सततच्या येणाऱ्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांमधे नाराजी सूर पहायला मिळत आहे. शिवाय या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना फेर परिक्षासुद्धा द्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या अडचणी कधी पर्यत दूर होईल? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा - आता कोरोनाबाधितांची क्षयरोग चाचणी होणार एक्स-रे आणि सीबीनॅटद्वारे
हेही वाचा - सात महिन्यानंतर जीम पुन्हा सुरू; 'देर आऐ दुरूस्त आऐ' म्हणत जीम चालकांकडून निर्णयाचे स्वागत