मुंबई : नागपूर पोलीस नियंत्रण कक्षास आलेल्या एका कॉलमुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. कॉलमुळे एका मागोमाग एक धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. आता तारक मेहता का उलटा चश्मामधील अभिनेता दिलीप जोशीच्या घराबाहेर 25 शस्त्रधारी आले असल्याची माहिती मिळाली आहे.
दिलीप जोशीच्या घराबाहेर 25 शस्त्रधारी : मुंबईतील ख्यातनाम आणि प्रसिद्ध अभिनेता मेघा स्टार अमिताभ बच्चन, अभिनेता धर्मेंद्र आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे बंगले बॉम्बने उडवण्याची माहिती नागपूर पोलीस नियंत्रण कक्षास एक मार्चला एका अज्ञात कॉलरने दिली. त्यानंतर आता तारक मेहता का उलटा चश्मा या प्रसिद्ध मालिकेतील जेठालालची भूमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी घराबाहेर 25 शस्त्रधारी आले असल्याची माहिती देखील या कॉलनी दिली. त्यामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
दादर परिसरातील शिवाजी पार्कमधील घटना : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञाताने कॉल केली होती. कॉल करून दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे देखील 25 शस्त्रधारी घुसले असल्याची माहिती त्यांनी दिली होती. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तारक मेहता का उल्टा चश्मा कलाकार दिलीप जोशी यांच्या घराबाहेर देखील 25 शस्त्रधारी आले असल्याची माहिती मिळाली होती
बंदुक आणि इतर शस्त्र : अभिनेता दिलीप जोशी यांच्या घराबाहेर बंदुक आणि इतर शस्त्र घेऊन 25 लोक उभे होते अशी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव कटके असल्याचे समजते. एका अज्ञात कॉलरचा कॉल नागपूर नियंत्रण कक्षाला आला. हाच तोच कॉलर होता ज्या कॉलरने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घरांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या कामासाठी मुंबईला गेलेल्या 25 लोकांचे संभाषण त्याने ऐकले असल्याचे कॉलरने पुढे सांगितले.
नंबर एका दिल्लीतील मुलाचा : नागपूर पोलीस नियंत्रण कक्षात आलेला हा नंबर एका दिल्लीतील मुलाचा आहे. तो मुलगा दिल्लीत सिम कार्ड प्रोव्हायडरसाठी काम करतो. त्याचा नंबर वापरण्यासाठी कोणता प्रोग्रॅाम वापरला गेला याची त्याला माहिती नसल्याची त्याने पोलिसांना दिली. नागपूर नियंत्रण कक्षाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्याला दिलीप जोशी यांच्यासंदर्भातील कॉलची माहिती दिली आहे. खऱ्या कॉलरची ओळख पटवण्यासाठी चौकशी शिवाजी पार्क पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा : 12th Maths Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्या प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल