ETV Bharat / state

Feeding Street Dogs : 'या' शहरात मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालण्यासाठी करावा लागणार मनपाकडे अर्ज - नागपूर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोकाट श्वानांना रस्त्यावर अन्न खाऊ घालणाऱ्या सर्व इच्छुक नागरिकांनी प्राणीप्रेमी संस्था आणि संघटनांनी नागपूर महानगरपालिकेकडे अर्ज सादर (fixing places for feeding street dogs in Nagpur) करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले (application to municipality In Nagpur)आहे.

Feeding Street Dogs
मनपाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन
author img

By

Published : Nov 22, 2022, 11:00 AM IST

Updated : Nov 23, 2022, 8:02 PM IST

नागपूर : मोकाट श्वानांना रस्त्यावर खाऊ घालण्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोकाट श्वानांना रस्त्यावर अन्न खाऊ घालणाऱ्या सर्व इच्छुक नागरिकांनी प्राणीप्रेमी संस्था आणि संघटनांनी नागपूर महानगरपालिकेकडे अर्ज सादर (fixing places for feeding street dogs in Nagpur) करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले (application to municipality In Nagpur) आहे.

प्रतिक्रिया देतांना महानगर पालिका अधिकारी

सविस्तर माहिती : मोकाट श्वानांना ज्या ठिकाणी अन्न खाऊ घालत (Feeding Street Dogs) आहे. त्या ठिकाणाबाबत सविस्तर माहिती, अन्न खाऊ घालण्याची वेळ, अन्न खाऊ घालत असलेल्या मोकाट श्वानांची अंदाजित संख्या इत्यादी सविस्तर माहिती अर्जामध्ये नमूद करावी, अशी सूचना मनपा उपायुक्त तथा घनकचरा विभागाचे संचालक गजेंद्र महल्ले यांनी केली आहे. मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालणारे नागरिक तथा प्राणी प्रेमी संस्था आणि संघटनांनी पशु वैद्यकीय सेवा कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाचवा माळा,नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स येथे अर्ज (application for feeding street dogs) करावा.

ठिकाणे निश्चित : प्राणी प्रेमींनी 15 दिवसांच्या आत संबंधितांनी मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालत असलेल्या ठिकाणाबाबतची माहिती विभागाला सादर करावी. या माहितीच्या आधारे सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालण्याची ठिकाणे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निश्चित करण्यात येईल, असेही डॉ. महल्ले यांनी (submission of application to municipality) सांगितले.

उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाला स्थगिती : नागपुरातील भटक्या कुत्र्यांना सार्वजनिकरित्या खायला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आणि सामान्यांसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश नागपूर महापालिकेला दिले. भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यात आणि त्यांचे संरक्षण करण्यात स्वारस्य असलेल्या लोकांनी त्यांना दत्तक घेऊन घरी नेले पाहिजे किंवा त्यांच्या देखभालीचा खर्च उचलावा, या उच्च न्यायालयाच्या निरीक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

कुत्रे पाळावेत असा आग्रह तुम्ही धरू शकत नाही : ज्यांना भटक्या कुत्र्यांना खायला द्यायचे आहे त्यांनी कुत्रे पाळावेत असा आग्रह तुम्ही धरू शकत नाही, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.

आदेशाची अंमलबजावणी करू नये : या प्रकरणावरील सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत उच्च न्यायालयाच्या 20 ऑक्टोबरच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही पावले उचलू नयेत, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने उल्लंघन केल्याबद्दल 200 रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले होते. हे लक्षात घेतले पाहिजे की सर्वोच्च न्यायालय त्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत होते, ज्यात उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते की, नागपूर आणि आसपासच्या भागातील कोणत्याही नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी, उद्यानात भटक्या कुत्र्यांना खायला द्यायचे नाही.

काय आहे नेमके प्रकरण : रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू नका, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. आयते खायला मिळत असल्याने अनेक ठिकाणी कुत्र्यांचे टोळके तयार झाले आहेत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ले करत असल्याचा घटना वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा न्यायालयाने नोंदवले होते. एवढंचं नाही तर भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

कुत्र्यांची वाढती संख्या चिंताजनक : आजच्या स्थितीत नागपूर शहरात सुमारे एक लाख भटके कुत्रे आहेत. २०१८ ही संख्या ८१ हजार झाली होती. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ठोस पावले उचलले नाहीत, त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वेगात वाढतचं आहे.

Last Updated : Nov 23, 2022, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.