ETV Bharat / state

पोलिसांच्या कारवाईनंतरही विदर्भवादी आंदोलनावर ठाम - चंडिका मंदिर नागपूर

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलनावर बसलेल्या विदर्भवाद्यांचे आंदोलन आज पोलिसांनी उधळून लावले आहे. नागपूरच्या इतवारी परिसरात विदर्भ चंडिका मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना विदर्भावाद्यांना मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरूवात केली आहे.

विदर्भवादी आंदोलनावर ठाम
विदर्भवादी आंदोलनावर ठाम
author img

By

Published : Aug 10, 2021, 4:10 PM IST

नागपूर - वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलनावर बसलेल्या विदर्भवाद्यांचे आंदोलन आज पोलिसांनी उधळून लावले आहे. नागपूरच्या इतवारी परिसरात विदर्भ चंडिका मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना विदर्भावाद्यांना मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरूवात केली आहे. जे पदाधिकारी इथे पोहचत आहे ते त्यांना ताब्यात घेत आहे. यात ताब्यात घेतलेल्यांना तहसील पोलीस स्टेशनमध्ये नेऊन थांबवण्यात आले. यात आंदोलनाची परवानगी नाकारली असल्याने पोलिसांनी आंदोलन करण्यास मनाई करत ही कारवाई केली आहे. यामुळे आंदोलक इतवारी परिसरात घटनास्थळी पोहचले की त्यांना उचलून आणण्याचे काम तहसील पोलिसांनी केले आहे. विदर्भवाद्यांच्या आंदोलनात कोरोना काळातील नियमांचा भंग करत गर्दी करून त्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विदर्भवादी आंदोलनावर ठाम

पोलिसांच्या कारवाईला आंदोलनकर्त्यांचा विरोध -

दरम्यान विदर्भवाद्यांच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. चार ते पाच कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पंधरा ते वीस पोलीस बराच वेळ संघर्ष करतांना दिसून आले. विदर्भवादी कार्यकर्ते काहीही केल्या आपले आंदोलनाचा ठिकाण सोडायला तयार नव्हते. एका महिला कार्यकर्त्यांनी तर पोलिसांच्या गाडीत टाकल्यावर सुद्धा 'मी काय चोर आहे का? मी आमच्या हक्कासाठी लढतेय' असे म्हणत या कारवाईला विरोध कायम ठेवला. यावेळी बऱ्याच प्रयत्नानंतर आंदोलकांना तहसील पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

विदर्भवादी आंदोलनावर ठाम
विदर्भवादी आंदोलनावर ठाम

आंदोलन दडपले जात असल्याचा आरोप -

यावेळी अगोदरच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप, संयोजक राम नेवले, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मसुरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामरडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी काही वेळाने पोलिसांनी सुटका केली असताना अध्यक्ष वामनराव चटप यांनी केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकार विदर्भवाद्यांचे आंदोलन पोलिसी दडपशाहीने चिरडत असल्याचा आरोप केला. तसेच हे आंदोलन 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत करण्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केले आहे. यामुळे हे आंदोलन असेच सुरू राहील. या पोलिसांना वाटत असले तर त्यानी कारागृहात टाकावे असाही इशारा दिला आहे.

विदर्भवादी आंदोलनावर ठाम
विदर्भवादी आंदोलनावर ठाम

हे आंदोलन असेच सुरू राहील...

यामुळे हे आंदोलन असेच सुरू राहील. यामुळे 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहील म्हणत हे आंदोलनकर्ते पुन्हा आंदोलनस्थळी म्हणजेच विदर्भ चंडिका मंदिर परिसरात जाऊन बसले आहे. यामध्ये आंदोलकांनी सोमवारी आंदोलन सुरू करताना मंदिरात जाऊन आंदोलन त्या मंदिर सुद्धा बंद केले, असाही आरोप आंदोलकानी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.