ETV Bharat / state

केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी - फडणवीस - देवेंद्र फडणवीस मागणी

राज्यात सत्ता संघर्षाला पूर्णविराम लागल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी भाजपकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट बघू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी"

nagpur
विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 1, 2019, 11:30 PM IST

नागपूर - शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट बघू नये. सर्वात आधी राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करावी. नंतर जेव्हा केंद्राकडून मदतनिधी प्राप्त होईल तेव्हा तो राज्याच्या तिजोरीत पुन्हा जमा करावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करावी - देवेंद्र फडणवीस

राज्यात सत्ता संघर्षाला पूर्णविराम लागल्यानंतर पाहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी भाजपकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "राज्याच्या आर्थिक स्थितीवर नव्या सरकारने श्वेत पत्रिका जाहीर करावी. आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, ते करण्यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे"

हेही वाचा - पुन्हा येईन म्हणाले मात्र, कुठे बसेन हे सांगितले नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी

शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "आम्ही कधीही शेतकऱ्यांना मदत देताना केंद्राच्या निधीची वाट पाहिली नाही. उलट राज्याच्या तिजोरीतूनच शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी"

Intro:सत्ता संघर्षावर पूर्णविराम लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात पाहिल्यादाच आगमन झाले...यावेळी भाजप कडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले...स्वागताना नंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांना मदत करताना राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट बघू नये...सर्वात आधी राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत केल्यानंतर ज्यावेळी केंद्राकडून मदत निधी प्राप्त होईल तो राज्याच्या तिजोरीत पुन्हा जमा करावा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे Body:राज्याच्या आर्थिक स्थितीवर नव्या सरकारने जरूर श्वेत पत्रिका जाहीर करावी आम्ही त्याच स्वागत करू...मात्र ते करण्यापूर्वी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे...शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्रा कडे मदत मागणार अशी माहिती नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत....यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की आम्ही कधीही शेतकऱ्यांना मदत देताना केंद्राच्या निधीची वाट बघितली नाही उलट राज्याच्या तिजोरीतूनच शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत केली आहे...ज्या प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी केली होती, त्या प्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे...केंद्रा कडून निधी येईल तेव्हा ते राज्या च्या निधीत जोडावे असं देखील ते म्हणाले आहेत

बाईट- देवेंद्र फडणवीस-माजी मुख्यमंत्रीConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.