नागपूर - गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील भिवसन खोरी येथे अवैध दारू निमिर्ती कारखाने सुरू होते. या कारखाण्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांनी छापा टाकून तब्बल ६ लाख रुपयांची अवैध दारू जप्त करून तिला नष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी ३ माहिलांना ताब्यात घेतले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दारूचा सडवा, रसायनाने भरलेले २०० लिटर क्षमतेचे ७४ प्लास्टिक ड्रम आणि ५६ लोखंडी ब्यारल्ससह ३५ लिटर क्षमतेचे १९० प्लास्टिक ड्रम आणि १९० लिटर मोहफुलांची तयार दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या भिवसनखोरी या परिसरात अवैध दारू निर्मितीचे अवैध धंदे सुरू आहेत. या संदर्भात शेकडो तक्रारी मिळल्याने प्रत्येक महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलिसांच्या मदतीने भिवसनखोरी येथे कारवाई करते. पण, पोलिसांच्या कारवाईनंतर पुन्हा त्याठिकाणी सर्रासपणे दारू निर्मिती कारखाने थाटले जातात. यावर कायमस्वरूपी उपाय होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
हेही वाचा- नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत बुडून 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू