नागपूर - अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा पायाभरणी समारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या नागपूरच्या निवासस्थानी रामाच्या विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण गडकरी कुटुंब पूजेत सहभागी झाले होते. राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी नितीन गडकरी यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी राम मंदिराच्या संदर्भांत आश्वासक वक्तव्य केले होते.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अयोध्या येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात निवडक अतिथींना निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने आपापल्या घरीच रामाची पूजा केली. नितीन गडकरी यांनी देखील विशेष पूजा आयोजित केली. केवळ घरातील मंडळींनीच या पूजेत सहभाग घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आणि पायाभरणी केली. यावेळी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 175 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात 135 संत-महंत असून, उर्वरित 40 विशेष पाहुणे होते. सर्व जण एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसले होते.