नागपूर: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नागपूरच्या मातीत असे गुण आहे की इथे संजय राऊत यांना सुबुद्धी येईल, तोच धागा धरत संजय राऊत यांनी फडणवीस सुबुद्धी ने वागले असते तर आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते असे विधान केले आहे. नागपूरच्या मातीत राहून ही दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि तुमचे मुख्यमंत्री पद गेले, शिवसेना आपला मित्रपक्ष आहे, हिंदुत्ववादी पक्ष आहे, आपण त्यांच्या सोबत मैत्रीच्या नात्याने राहिलो पाहिजे,अशी सुबुद्धी तुम्हाला त्यावेळी आली असती तर कदाचित आज आपण राज्याचे मुख्यमंत्री राहिला असता मात्र, तुम्हाला तेव्हा दुर्बुद्धी सुचली आणि तुम्ही आम्हाला सुबुद्धीचे सल्ले देत आहात कदाचित नागपूर भाजप नेत्यांना सुबुद्धीचे अजीर्ण झाले आहे असा टोला देखील संजय राऊत यांनी लावला आहे.
नागपूर महानगरपालिकेमध्ये (Nagpur Municipal Corporation) अनेक घोटाळे असताना नागपूरच्या नेत्यांना मुंबई महापालिकाच दिसत आहे. त्यांना मुंबई महापालिकेत शिवसेनेने काम केलेले नाही असे दिसत आहे. अरे काम केलं नसते तर एवढी वर्षे सत्तेत राहिलो असतो का. आता नागपूर महानगरपालिकेचे घोटाळे बाहेर काढू आणि नागपूर महानगरपालिकेत शिवसेनेचे किमान 25 नगरसेवक पाठवल्या शिवाय थांबणार नाही असे ही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले
हेही वाचा : Load Shedding : वीज जपून वापरा, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे आवाहन