नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षा निमित्त वर्धा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना काही विदर्भाद्यांनी पत्रक फेकून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी तीनही आंदोलकांना ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात नेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण संपत असताना पुन्हा काही विदर्भवादी महिलांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले आहे.
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज वर्ध्यात होत आहे. मराठी साहित्य संमेलनात सहभागी पाहुण्यांचे चरखा सुत देऊन स्वागत करण्यात आले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगणात साहित्य संमेलन ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची उपस्थीती : वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते उपस्थित आहेत. ग्रंथ दिंडीत विठ्ठल-रुखमाई, संत समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई यांचा समावेश आहे. मदर तेरेसा. विविध शाळांमधील विद्यार्थी इतर महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मोजरीच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ‘जय हरी विठ्ठल’चा जयघोष केला. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून ग्रंथ दिंडीचे स्वागत करण्यात आले. संमेलनस्थळी पोहोचताच साहित्यिकांचा जल्लोष झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साहित्य दिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाची रुपरेषा -
दुपारी 4.30 वाजता - संमेलनाध्यक्षांचे भाषण
सायं. 5.30 वाजता – ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ वर परिसंवाद
सायं. 7.00 वाजता – ‘ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रिय’वर परिसंवाद
रात्री 8.30 वाजता – निमंत्रितांचे कविसंमेलन
मनोहर म्हैसाळकर सभामंडप
कथाकथन
सायं. 6.30 वाजता – ‘विदर्भातील बोलीभाषा’ वर परिसंवाद
सायं. 8.00 वाजता – ‘मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम
इतर कार्यक्रम
हेही वाचा - MPSC students protest : अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन