नागपूर - राज्याच्या उपराजधानीत कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला आहे. आज सकाळच्या सत्रात ६१ कोरोना संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८४० वर गेली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण नाईक आणि बांगलादेश परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ५०० रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले असून १५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३२५ झाली आहे.
या पूर्वी एकाच दिवशी ६३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आज ६१ कोरोनाबाधित रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात जुना रेकॉर्ड मोडीत निघून एकाच दिवसात सर्वोच्च रुग्ण संख्या पुढे येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.