नागपूर - नेत्रदान आणि अवयव दानासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने नागपूर येथील गायक सुरज शर्मा हे शनिवारपासून आपल्या गायनाला सुरुवात करणार आहेत. ते सलग १२८ तास गायन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
युथ वेल्फेअर असोसिएशन तर्फे आयोजित नेत्रदान आणि अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने गायक सुरज शर्मा यांनी १२८ तास अखंड गायन करण्याचा निर्धार केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून ते १२८ तास अखंड गायन करणार आहेत. शनिवारी सकाळी त्यांच्या गायनाला सुरुवात होणार असून २८ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता १२८ तास पूर्ण झाल्यानंतर त्यांचे गायन थांबेल.
१२८ पूर्ण केल्यानंतर त्यांच्या नावे नवा विश्वविक्रम प्रस्थापित होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ते अवयवदानासंदर्भात जनजागृती करतील सोबतच त्यांच्या गायनामध्ये सर्वाधिक देशभक्तीपर गीतांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना ते श्रद्धांजली देखील अर्पण करणार आहेत.