ETV Bharat / state

"इंदोरीकरांच्या वादग्रस्त प्रवचनामुळे वारकरी संप्रदायाचे नुकसान"

इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात संतती प्राप्त होण्यासाठी सम-विषमचा फॉर्म्युला मांडला होता, ते म्हणाले होते की सम तारखेला पती-पत्नी मध्ये संबंध आल्यास मुलगा होतो,आणि विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.

indorikar kirtan cotroversy
श्याम मानव
author img

By

Published : Feb 29, 2020, 4:22 PM IST

Updated : Feb 29, 2020, 7:03 PM IST

नागपूर - कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त प्रवचनामुळे वारकरी संप्रदायाचे नुकसान होत असून त्यांनी लिंग निवडीबद्दल मांडलेला सम-विषम फॉर्म्युला कायद्याने गुन्हा ठरत असल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे. इंदोरीकर महाराजांनी संत तुकोबा, ज्ञानोबा यांच्या विचारांमध्ये वैधानिक दृष्टीकोन होता मग त्यांच्या नावाने कीर्तनाची परंपरा धुळीस मिळवण्याचा कुणालाही अधिकार मिळत नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. नागपूर येथे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना हे सांगितले.

"इंदोरीकरांच्या वादग्रस्त प्रवचनामुळे वारकरी संप्रदायाचे नुकसान"

हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही

इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात संतती प्राप्त होण्यासाठी सम-विषमचा फॉर्म्युला मांडला होता, ते म्हणाले होते की सम तारखेला पती-पत्नी मध्ये संबंध आल्यास मुलगा होतो,आणि विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी होते, या त्यांच्या दाव्यावरून गेली पंधरा दिवस रोज नवनवीन वाद पुढे येत आहेत. राजकिय आणि सामाजिक संघटना या वादाच्या केंद्रस्थानी आल्याने तो चिघळत गेला आहे, ज्यामुळे वारकरी संप्रदाय बदनाम होत असल्याचे मानव म्हणाले.

इंदोरीकर महाराजांच्या सम-विषमच्या फॉर्म्युल्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, एवढेच काय तर सावरकरांनी सुद्धा हा मुद्दा खोडून काढलेला होता. इंदोरीकर महाराजांनी या संपूर्ण प्रकारावर माफी मागितल्यानंतर वाद थांबायला हवा, असे देखील श्याम मानव म्हणाले आहेत. इंदोरीकर महाराजांनी या विषयी केलेले वक्तव्य एका अर्थाने कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा देखील ठरत असल्याने या पुढे त्यांनी केवळ समाज प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशी इच्छा श्याम मानव यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पाथर्डीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी, पाहिजे ती मदत करणार - गृहमंत्री

Last Updated : Feb 29, 2020, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.