नागपूर: पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जाते आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. हिंदूसह मुस्लिमसह इतर धर्माचे नागरिक उत्सवात सहभागी होत असतात. पोद्दारेश्वर राम मंदिर हे केवळ नागपूरचे नव्हे तर, विदर्भाची सांस्कृतीक आणि धार्मिक ओळख झाली आहे. मंदिराला शंभर वर्षांचा मोठा इतिहास आहे. एवढेच नाही तर मध्य भारतात प्रसिद्ध असलेल्या भव्य राम नवमीला निघणाऱ्या शोभायात्रेचा वारसा या मंदिराने जोपासला आहे.
पोद्दारेश्वर राम मंदिराचा इतिहास: ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर हे नागपुरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारी आहे. नागपुरातील धार्मिक कुटुंबातील जमनाधार पोद्दार यांनी १९१९ साली स्वखर्चाने मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९२३ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या अतिशय सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा, जमनाधार पोद्दार यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळेच या मंदिराला पोद्दारेश्वर राम मंदिर म्हणून ओळखले जाते. आज या घटनेला ९९ वर्षांचा ऐतिहासिक काळ पूर्ण झाला आहेत. मंदिराने १०० वर्ष पूर्ण केले आहे. १९५२ साली जमनाधार पोद्दार यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा रामकृष्ण पोद्दार आणि त्यांची मुले मंदिराच्या सेवेत कार्यरत आहेत.
मंदिराची रचना: मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख भगवान श्रीराम, सीताराम आणि लक्ष्मणाची मूर्ती नजरेस पडते. मंदिराच्या उजव्या बाजूला शिवमंदिर आहे. या शिवाय मंदिरात हनुमान, विष्णू लक्ष्मी, गरुड, सुग्रीव, गंगा, महालक्ष्मीच्या मुर्त्या आहेत. जयपूरचे गोविंदराम उदयराम यांनी या मुर्त्या घडवल्या आहेत. याशिवाय अष्ठकोनी सभामंडप मंदिराची शोभा वाढवतो. पितळ आणि लाकडाचा वापर करून मंदिराचे द्वार तयार करण्यात आले आहे. तसेच मुस्लिम धर्मियांकडून अनेक ठिकाणी या शोभायात्रेच्या मार्गावर फुलांची उधळण करतात. त्यामुळे नागपूरातून सर्वधर्मसमभावचा महत्वपूर्ण संदेश जगाला दिला जातो. त्यामुळेच या शोभायात्रेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा: एका धार्मिक परिवारातील जमनाधारजी पोद्दार यांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला. स्वखर्चाने मंदिराचे काम सुरू केले होते. मंदिराच्या निर्मितीसाठी लाल, काळ्या रंगाचे दगड कोराडी येथून आणण्यात आले होते.तर शिल्पकार जयपूरचे होते. फाल्गुन शुक्ल 12 शके 1979 अर्थात २८ फेब्रुवारी 1923 रोजी श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जमनाधरजींच्या हस्तेच करण्यात आली होती. त्यासाठी खास काशीवरून पं. प्रभुदत्तजी हे पौरोहित्य करण्यासाठी आले होते. रामाचे हे मंदिर पोद्दार यांनी बांधल्यामुळे ते पोद्दारेश्वर श्रीराम मंदिर म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा: Holi 2023 होळीधुळवडीसाठी उत्सुक असणाऱ्यांनी बघा कसा तयार होतो गुलाल