नागपूर - आंध्रप्रदेशच्या धर्तीवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना 21 दिवसात कठोर शिक्षा व्हावी, असा कायदा महाराष्ट्र विधानसभेत संमत करावा, अशी मागणी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
हेही वाचा - 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये चंद्रकांत पाटलांनीच केला भ्रष्टाचार'
बलात्काऱ्यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी कठोर कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी, तो कायदा सभागृहात मंजूर करावा, यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन दिले असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.