ETV Bharat / state

काळी बुरशी अन् कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी वरिष्ठ अधिकारी गाव भेटीला - नागपूर जिल्हा बातमी

म्युकरमायकोसिस व कोरोनाची संभाव्य तिसरी लाट याबाबत जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 13 पथके तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये हे पथक जनजागृती करणार आहेत.

बैठक
बैठक
author img

By

Published : May 27, 2021, 3:47 PM IST

Updated : May 27, 2021, 5:50 PM IST

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून नागपुर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली यात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांमधील रुग्ण संख्येत वाढ होत आल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. पावसाळा तोंडावर असताना कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यामध्ये लहान मुलांना धोका असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने जनजागृती करण्याची तयारी केली आहे. याअंतर्गत आजपासून (दि. 27 मे) नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यात 26 अधिकऱ्यांमार्फत जनजागृती अभियानाची सुरुवात झाली आहे.

बोलताना जिल्हाधिकारी

हे असतील उद्देश

अधिकारी प्रत्येक गावात जाऊन तेथील पायाभूत सुविधा बळकट करणे, आरोग्य यंत्रणेला गतिशील करणे, लसीकरणाला गती देणे, म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करणे, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये व ज्यांचा मातीशी, शेतीशी संबंध येतो अशा सर्वांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आजपासून ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जात आहेत. नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीनंतर या अधिकाऱ्यांना खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या चित्रफीत आणि पोस्टर देवून रवाना करण्यात आले.

चित्रफीत अन् मार्गदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती

कामठी, मौदा, उमरेड, कुही, भिवापूर, सावनेर, काटोल, कळमेश्वर, नरखेड, हिंगणा, नागपूर ग्रामीण, रामटेक, पारशिवनी, असे 13 पथक तयार करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकारी या पथकाचे प्रमुख असून त्यांच्यासोबत ग्रामपंचायत निहाय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, स्थानिक खासगी वैद्यकीय व्यवसायिक, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित राहणार आहेत. कोरोना तसेच म्युकरमायकोसिस, आजाराबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेले व्हिडिओ सर्व प्रथम गावागावांमध्ये दाखविले जाणार आहे. त्यानंतर अधिकारी मार्गदर्शन करणार असून दररोजचा अहवाल जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना सादर केला जाणार आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या कमी करणे, संभाव्य तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. आजपासून जिल्ह्याच्या सर्व भागात त्याचा अंमल केला जाणार आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गेल्या आठवड्यात ग्रामीण भागाचा दौरा केला होता.

हेही वाचा - 'मला मुलगी हवी होती' म्हणत, दारूच्या नशेत बापाने एक वर्षाच्या चिमुकल्याला दगडावर फेकले

Last Updated : May 27, 2021, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.