ETV Bharat / state

नागपूरमधील एम्प्रेस शॉपिंग मॉलवर ईडीची कारवाई, बँकेची ४८३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका

शहरातील प्रसिद्ध एम्प्रेस शॉपिंग मॉल अंमलबजावणी निदेशालयाने (ईडी ) जप्त केला आहे. बँकेची ४८३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

author img

By

Published : May 15, 2019, 10:18 AM IST

नागपूरमधील एम्प्रेस शॉपिंग मॉलवर ईडीची कारवाई

नागपूर - शहरातील प्रसिद्ध एम्प्रेस शॉपिंग मॉल अंमलबजावणी निदेशालयाने (ईडी ) जप्त केला आहे. बँकेची ४८३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इम्प्रेस मॉल के. एस. एल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या मालकीचा असून या मॉलवर मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई केल्यामुळे मॉलमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

नागपूरमधील एम्प्रेस शॉपिंग मॉलवर ईडीची कारवाई

नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या एम्प्रेस शॉपिंग मॉलमध्ये नामांकित कंपनीचे शेकडो शॉपिंग सेंटर आहेत. एवढेच नाही, तर विविध सिनेमा थिएटरदेखील या मॉलमध्ये आहेत. दिवसभर हजारो ग्राहकांची या ठिकाणी वर्दळ असते. जप्त करण्यात आलेल्या एम्प्रेस मॉलची किंमत सुमारे ४८३ कोटी रुपये असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. ईडीने जप्तीचीही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीएमएलए) केली आहे.

दोन राष्ट्रीयकृत बँकांचे ५२४ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या ३ गुन्ह्यांच्या तपासाला सुरुवात केली आहे. यातील के.एस.एल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचीही या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Intro:नागपुरातील प्रसिद्ध एम्प्रेस शॉपिंग मॉल अंमलबजावणी निदेशालय (ईडी ) जप्त केले आहे..... बँकेची ४८३ कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी निदेशालयाने कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे....अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नागपूरमधील एम्प्रेस शॉपिंग मॉल वर जप्तीची कारवाई केल्याने खळबळ माजली असून मॉल मधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे
Body:नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या एम्प्रेस शॉपिंग मॉल मध्ये शेकडो नामांकित कंपनीचे शॉपिंग सेंटर आहेत.... एवढच नाही तर विविध सिनेमा थिएटर देखील या मॉल मध्ये आहेत.... दिवसभर हजारो ग्राहकांची एम्प्रेस मॉल मध्ये वर्दळ असते.... आज दुपारी एम्प्रेस शॉपिंग मॉल अंमलबजावणी निदेशालय (ईडी ) ने जप्त केल्याची माहिती समजताच व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे..... के एस एल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची मालकी असलेल्या इम्प्रेस मॉलवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे..... नागपूरमधील इम्प्रेस मॉल के एस एल अँड इंडस्ट्रीज लिमिटेडया कंपनीच्या मालकीचा असून या मॉलवर मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.... जप्त करण्यात आलेल्या एम्प्रेस या मॉलची किंमत सुमारे ४८३ कोटी रुपये असल्याचा दावा ईडी कडून करण्यात आला आहे.... ईडीने जप्तीची हि कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा (पीएमएलए) या अंतर्गत केली आहे..... दोन राष्ट्रीयकृत बँकांचे ५२४ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु असून या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या तीन गुन्ह्यांच्या तपासाला सुरुवात केली होती. यातील केएसएल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचीही या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु आहे.
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.