ETV Bharat / state

Nagpur Crime : नागपुरात तृतीयपंथीसाठी १४४ सीआरपीसी लागू; नकली तृतीयपंथींचा वावर वाढला

author img

By

Published : Jan 20, 2023, 3:08 PM IST

नागपूर शहर आयुक्त अमितेशकुमार यांनी १४४ सीआरपीसी प्रमाणे आदेश लागू केला आहे. त्यावर समाजात नकली तृतीयपंथींचा वावर वाढलेला आहे. त्यांच्याद्वारे सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो त्यामुळे खऱ्या तृतीयपंथींचे नाव बदनाम होत असल्याचे स्पष्टीकरण तृतीयपंथीयांकडून करण्यात येत आहे.

Nagpur transgender order as per 144 Crpc applicable
नागपूरात तृतीयपंथीसाठी १४४ सीआरपीसी प्रमाणे आदेश लागू
नागपूरात तृतीयपंथीसाठी १४४ सीआरपीसी लागू

नागपूर : नागपूर शहरातील तृतीयपंथीयांविरोधात वाढत्या तक्रारीचा ओघ लक्षात घेता. पोलीस आयुक्तांनी तृतीयपंथीयांविषयी १४४ सीआरपीसी प्रमाणे आदेश लागू केला आहे. एखाद्या ठिकाणी शुभ कार्य असते त्याठिकाणी तृतीयपंथी गोंधळ घालतात. अशा आलेल्या तक्रारींवरून आयुक्त अमितेशकुमार यांनी हा आदेश जारी केला आहे.

शहरात भितीचे वातावरण : नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत, सर्व पोलीस स्टेशन हद्दीत निवासस्थान, व्यवसाय प्रतिष्ठाण व वाहतूक सिग्नलवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांकडून पैसे मागितले जातात. शहरात लग्न, उत्सव, स्नेहसम्मेलन, धार्मीक कार्यकम, जन्म सोहळा किंवा मृत्यु प्रसंगी ते एकट्याने किंवा एकत्रितपणे अश्लील व भीतीदायक वर्तन करतात. नागरिकांना पैसे देण्यास भाग पाडतात. त्यांच्या अशा बेकायदेशीरपणे उपद्रव निर्माण करून खंडणी वसूल करण्याच्या कृत्यामुळे शहरातील नागरीकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पैसे वगैरे मागण्यास मनाई : विशेषतः तृतीयपंथीय आणि अशाप्रकारच्या इतर काही लोकांच्या गटांना याद्वारे शहरात एकट्याने किंवा एकत्रितपणे फिरण्यास आणि निवासस्थान,अस्थापना इत्यादी ठिकाणी शुभ कार्यात मालकांनी आमंत्रित केल्याशिवाय जाण्यास मनाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांना ट्रैफिक जंक्शन,चौकात एकत्र येण्यास आणि वाहनचालक प्रवाशांकडून पैसे वगैरे मागण्यास मनाई करण्यात येत आहे.

कलम १४४ लागू : याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश पोलीस आयुक्त नागपुर शहर यांनी निर्गमीत केले आहे. सदर आदेश दिनांक १७.फेब्रुवारी २०२३ पर्यंत लागु राहील. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती किंवा गटावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत कलम १८८ भा.द.वि. प्रमाणे तसेच त्यांनी वरील प्रमाणे कृत्य केल्यास कृत्याअनुरूप कलम १४३, १४४, १४७, १५९, २६८, ३८४, ३८५, ५०३, ५०४, ५०६ भादंवि तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६७, ६८, १११, ११२ व इतर अन्य प्रचलीत कायदयानुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

तृतीयपंथीनी दिली प्रतिक्रिया : समाजात नकली तृतीयपंथींचा वावर वाढलेला आहे. त्यांच्याद्वारे सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो त्यामुळे खऱ्या तृतीयपंथींचे नाव बदनाम होत असल्याचा आरोप विद्या कांबळे यांनी केला आहे. नागरिकांना शुभप्रसंगी तृतीयपंथांना दानदक्षिणा द्यायची असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन देखील विद्या कांबळे यांनी केले आहे.

हेही वाचा : Pune Crime : धक्कादायक! पुत्रप्राप्ती, भरभराटीसाठी अघोरी पूजा; महिलेला मानवी हाडांची राख खायला लावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.