ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

author img

By

Published : Dec 17, 2019, 7:42 AM IST

Updated : Dec 17, 2019, 12:41 PM IST

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सभागृहामध्येच शिवसेना आणि भाजप आमदारामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर गोंधळात कामकाज घेऊन काही विधेयक मंजूर करण्यात आले.

second day of winter assembly session in nagpur
विधानभवन

नागपूर - हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. येत्या २१ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सभागृहामध्येच शिवसेना आणि भाजप आमदारामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर गोंधळात कामकाज घेऊन काही विधेयक मंजूर करण्यात आले.

विधानसभेतील घडामोडी :

  • १२.०७ : विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
  • १२.०६ : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक- 2019 गोंधळात मंजूर
  • दु. १२.०५ : महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता ( सुधारणा) 2019 विधेयक गोंधळात मंजूर
  • दु. १२.०३ - महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक -२०१९ गोंधळात मंजूर झाले
  • ११.५४ : लक्षवेधी सूचना आणि राज्यपालांचे अभिभाषण पुढे ढकलले
  • ११.५४ : राज्य सरकारने ६६०० कोटी अवकाळी मदत दिली. २१०० कोटी प्रत्यक्ष दिले आहे. १४ हजार ६०० कोटी केंद्राकडे मागितले आहे. येथे विरोध करण्यापेक्षा मोदींना भेटण्यासाठी आमच्यासोबत या : मंत्री जयंत पाटील
  • ११.५३ : हेक्टरी २५ हजार मदत शेतकऱ्यांना दिलीच पाहीजे - फडणवीस
  • ११.५२ : विरोधक यापुढे अंगावर धावून येणार नाही, अशी आम्ही दक्षता घेऊ - फडणवीस
  • ११.५१ : भविष्यात अशी घटना घडू नये अशी अपेक्षा आहे - पटोले
  • ११.५० : विरोधकांचा सभागृहात पुन्हा गदारोळ, गोंधळामध्येच कामकाज सुरू
  • ११.४७ : विधानसभेचे कामकाज सुरू
  • स. ११.38 : : विधानसभा सभागृह दुसऱ्यांदा १० मिनिटांसाठी तहकूब
  • स. ११.११ : सभागृहात हमरी तुमरी सुरू. शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार हरिश पिंपळे यांच्यात हाणामारी
    second day of winter assembly session in nagpur
    सभागृहात हमरी तुमरी सुरू
  • स. ११.०८ : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब
  • स. ११.०५ : विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात, सुरुवातीलाच विरोधकांची घोषणाबाजी
  • स. ११.०४ : हेक्टरी २५ हजार मदत दिल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही - फडणवीस
  • स. 9.43 : सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या स्वतंत्र बैठका सुरू

हे वाचलं का? - हिवाळी अधिवेशन : राहुल गांधीचे नाव घेताच बोलू न दिल्याने विरोधकांचा सभात्याग

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक सावरकर मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर देखील घोषणाबाजी केली. इतकेच नाहीतर सभागृहात देखील विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र, आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडले.

दरम्यान, शेतकरी मदत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धारेवर धरणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी पहिल्या दिवशी सावरकर मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. तसेच भाजप आमदारांनी विधीमंडळ आवाराबाहेर 'मी पण सावरकर' टोप्या घालून निदर्शन देखील केले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 17, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.