नागपूर - खासगी शाळांच्या प्रवेश शुल्कामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे खासगी शाळेत मुलांना कसे शिकवावे? हा प्रश्न पालकांना पडला आहे. पालकांना प्रवेश शुल्काची चिंता करावी लागत आहे. खासगी शाळांच्या वाढत्या शुल्कावर अंकुश लावावा, अशी मागणी घेऊन चिमुकल्यांचा एक मोर्चा विधानभवनावर धडकला.
मोर्चातील शाळकरी मुलांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांनी पाच वर्षांत काय केलं; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांना प्रतिप्रश्न
हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विधानभवणार मोर्चांचे सत्र सुरू आहे. आपल्या विविध मागण्या घेऊन पंधरा मोर्चे विधानभवनावर धडकले. या मोर्चांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी काढलेला मोर्चा लक्षवेधी राहिला.