नागपूर : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत संपूर्ण देश सामावला आहे. मुंबईमध्ये मराठी माणसासोबत बिहार उत्तर प्रदेश गुजरात सर्व प्रांताचे लोक गुण्या गोविंदाने राहतात आणि आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो असे संजय राऊत म्हणाले आहेत. आधी सीमा भाग केंद्रशासित करा, कारण तिकडे मराठी बांधवांवर गेली 75 वर्षे भाषिक अत्याचार होता आहे, म्हणून आम्ही ती मागणी करत आहो असे (Sanjay Raut) संजय राऊत म्हणाले.
माझेही फोन टॅप झाले होते : राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप झाले होते. ही बाब समोर आल्यानंतर रश्मी शुक्लावर (Rashmi Shukla) कारवाई अद्याप झालेली नाही. त्याकाळात माझा सुद्धा फोन टॅप झाला होता असे संजय राऊत म्हणाले आहेत.
अनेक मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड : एकाच प्रकारच्या मंत्र्यांची प्रकरण बाहेर येत आहेत. काही लोक म्हणतात बॉम्ब कधी फुटतात, ही सुरुवात आहे. संजय राठोड यांच्या दोन जमिनीचे प्रकरण,अब्दुल सत्तार यांचे प्रकरण, कृषी कर्मचाऱ्यांना कोट्यावधी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली असे अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. या क्षणी आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहे, पण आमच्यासाठी सीमा प्रश्न ठराव महत्त्वाचा होता.
भ्रष्टाचाराचा वेताळ भाजपच्यापाठीवर : भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन चालणं भारतीय जनता पक्षाला जड होत आहे, कारण भारतीय जनता पक्ष याच बदनाम होत आहे. महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्री म्हणजे अलिबाबा 40 चोर आहेत आणि हळूहळू चाळीस मंत्री आणि आमदार यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येतील.
नवीन वाद उफाळण्याची शक्यता : हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) राज्य सरकारने विरोधकांच्या अनेक नेत्यांवर एसआयटी (MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut) चौकशी लावली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना खरपूस उत्तर दिले आहे. मात्र यावेळी त्यांनी संजय राऊतांवर (Shiv Sena Mp Sanjay Raut) अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली. त्यावरुन नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांना कामधंदा उरला नाही संजय राऊतांचे (Shiv Sena Mp Sanjay Raut) तोंड सारखे वळवळ करते, म्हणून ते सरकारवर टीका करतात. मुळात संजय राऊतला (MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut) काहीही कामधंदा उरला नाही. काहीही चुकीचे होत असेल तर त्याची चौकशी लावणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते. त्याला जर खाज म्हणत असेल तर त्याच्या सारखा नालायक माणूस कोणीच नाही, असेही संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut) यावेळी म्हणाले.