ETV Bharat / state

नागपूर मनपावर कमळ फुललं, महापौरपदी संदीप जोशींची निवड - newly mayor Sandip Joshi

महानगर पालिकेच्या ५३ व्या महापौरपदी मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदी मनीषा कोठे यांची निवड करण्यात आली आहे.

नागपूर महापौरपदी निवड झाल्यानंतर संदीप जोशींची विजयी रॅली
author img

By

Published : Nov 22, 2019, 5:10 PM IST

नागपूर - महानगर पालिकेच्या ५३ व्या महापौरपदी मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना १०४ मते मिळाली. तर उपमहापौर पदी मनीषा कोठे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनाही १०४ मते मिळाली आहेत.

नागपूर महापौरपदी निवड झाल्यानंतर संदीप जोशींची विजयी रॅली

भाजपच्या संदीप जोशी यांना १०४, आघाडीच्या हर्षला साबळे यांना २६ मते तर बसपाचे उमेदवार मोहम्मद इब्राहिम तौफीक यांना १० मते मिळाली. तसेच उपमहापौर पदासाठी भाजपच्या उमेदवार मानिषा कोठे यांना १०४, आघाडीचे दूनेश्वर पेठे यांना २६ मते तर बसपाच्या उमेदवार मंगला लांजेवार यांना १० मते मिळाली.

महापौरांची जागा यावेळी खुल्या प्रवर्गासाठी रिक्त असल्याने अनेकांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, सत्तापक्ष नेते म्हणून संदीप जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संदीप जोशी सव्वा वर्ष आणि त्या नंतर दयाशंकर तिवारी सव्वा वर्ष महापौर पदाचा पदभार सांभाळतील.

या निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका बजावली. शिवसेनेचे २ नगरसेवक महानगरपालिकेत आहेत. मात्र ते निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित नव्हते. नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Intro:नागपूर

नागपूर मनपा वर कमळ फूलल महापौर पदी संदीप जोशी तर उपमहापौर पदी मनीषा कोठे ची निवड

नागपूर माहानगर पालिकेच्या ५३ व्या महापौर पदी मनपा चे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे १०४ मत त्यांना मिळाली आहेत.तर उपमहापौर पदी मनीषा कोठे ची निवड करण्यात आली आहे त्यांना १०४ मते मिळाली आहेत. Body:भाजप चे संदीप जोशी ला १०४,
आघाडी च्या हर्षला साबळे-२६ मते तर बसपा चे उमेदवार मोहम्मद इब्राहिम तोहफीक यांना १० मत मिळालित तसच उपमहापौर पदा साठी असलेलं बीजेपी च्या उमेदवार
मानिषाताई कोठे यांना १०४,आघाडी चे दूनेश्वर पेठे ना २६ मत तर बसपा च्या उमेदवार मंगला लांजेवार यांना १० मत मिळालीत. खुल्या प्रवर्गा साठी महापौरांची जागा रिक्त असल्यानं अनेकांमध्ये रस्सीखेच सूरु होती मात्र सत्ता पक्ष नेते म्हणून संदीप जोशी च्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आलं.संदीप जोशी सव्वा वर्ष आणि त्या नंतर दया शंकर तिवारी सव्वा वर्ष महापौर पदाचा पदभार सांभाळतील.Conclusion:या निवडणूकीत शिवसेनेच्या नगर सेवकांनी तठस्थ भूमिका बजावली. शिवसेनेचे २ नगर सेवक महानगरपालिकेत आहेत मात्र निवडणुक प्रक्रिये साठी उपस्थित नव्हते. नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे त्या मुळे महानगरपालिकेच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय

बाईट- संदीप जोशी महापौर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.