ETV Bharat / state

Sana Khan Missing Case : सना खान बेपत्ता प्रकरणाचे गुढ वाढले.. गुंड पप्पू साहूबरोबरील लग्नाचे कागदपत्रे आले समोर

बेपत्ता भाजपा नेत्या सना खान यांच्या बेपत्ता प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सना खान आणि गुंड अमित उर्फ पप्पू साहू यांच्या लग्नाचे कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, सना खान आणि पप्पू साहू हे दोघेही बेपत्ता असल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.

Sana Khan Missing Case
भाजपा नेत्या सना खान
author img

By

Published : Aug 9, 2023, 8:33 AM IST

Updated : Aug 9, 2023, 9:10 AM IST

पोलीस उपायुक्त राहुल मदने

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक महिला नेत्या सना खान गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहेत. सना खान या जबलपूरच्या गोरा बाजार परिसरातील पप्पू उर्फ अमित साहू याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या दोघांच्या लग्नाचे कागदपत्र पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघेही बेपत्ता असल्याने सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याची चर्चा नागपूरमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले आहे.

Sana Khan Missing Case
सना आणि पप्पू साहूच्या लग्नाचे कागदपत्र

जबलपूरमध्ये शेवटचे लोकेशन : नागपूर शहरातील महिला भाजपाच्या नेत्या सना खान यांना शोधण्यासाठी मानकापूर पोलीस तपास करत असताना त्यांचे शेवटचे लोकेशन मध्यप्रदेशच्या जबलपूर शहरातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मानकापूर पोलिसांचे एक पथक जबलपूरमध्ये चार दिवस तळ ठोकून होते. जबलपूर येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे, त्याची पुष्टी अद्याप नागपूर पोलिसांनी केलेली नाही. यासंदर्भात झोन दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनीदेखील हे वृत्त सध्या निराधार आल्याचे स्पष्ट केले आहे.

पप्पू साहूची गुन्हेगारी पार्श्वभूमी : सना खान या नागपुरातून पप्पू उर्फ अमित साहूला भेटायला गेल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र पप्पू साहू हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आहे. पप्पू जबलपूर येथे आशीर्वाद नावाचा ढाबा चालवतो. 2013 मध्ये पप्पूवर वाळू तस्करीच्या वादातून दोघांचा खून केल्याचा आरोप आहे. या खून प्रकरणात पप्पू सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याच्यावर दारू तस्करीचेही आरोप आहेत. त्याचे एका महिलेसोबत लग्न झाल्याची चर्चा आहे. मात्र दोघात वाद झाल्याने घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या पप्पूचा आशीर्वाद ढाबा बंद आहे. पोलिसांनी त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्याबाबत माहिती विचारली असता, 2 ऑगस्टला त्याच्या घरात वाद झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कोणालाही त्याच्या घरी प्रवेश देण्यात आला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

असा आहे बेपत्ता होण्याचा घटनाक्रम : पोलिसांच्या माहितीनुसार सना खान या 1 ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. त्यांना जबलपूर येथील एकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जबलपूरला गेल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांचा संपर्क होत नसल्याने सना खानच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून पोलीस सना खान यांचा शोध घेत आहेत.

सनाचे कुटुंबीय बघत आहेत वाट : तीन ऑगस्टपासून सना खानसोबत संपर्क होऊ शकत नसल्याने नागपुरात राहणारे त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत. त्यातच अनेक प्रकारच्या अफवा पसरत असल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सना खान जबलपूरला गेल्यानंतर अमित साहू हा देखील बेपत्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.

पोलिसांचा तपास सुरू : भाजपच्या महिला नेत्या सना खान या बेपत्ता झाल्यापासून तर आजपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. पोलिसांची दोन पथके जबलपूर पोलिसांच्या मदतीने यावर तपास करत असून आद्यप तपासाचा धागा पोलिसांना गावसलेला नाही. सना खान 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. 2 तारखेला त्यांनी कुटुंबातील लोकांसोबत संपूर्ण केला मात्र, 3 ऑगस्टनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

हेही वाचा -

  1. BJP Sana Khan Missing : बेपत्ता भाजपा नेत्या सना खानसोबत घातपात? वाचा पोलीस काय म्हणाले...

Last Updated : Aug 9, 2023, 9:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.