नागपूर : मुंबई आणि नागपूर शहराला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गवरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रोच्या रिच टू व रिच थ्री याचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा रस्त्याने लागणारा वेळ 15 तासावरून आठ तासावर येणार आहे. एकूण 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. एकूण हा रस्ता आठ पदरी असणार आहे. दोन्ही बाजूला चार-चार पदर असतील. समृद्धी महामार्गात अनेक अडथळे होते. समृद्धी महामार्गावरच त्याला समांतर रेल्वेचा ट्रॅक टाकून रेल्वे चालवण्याबाबतचा शासनाचा विचार आहे. या रेल्वेची गती प्रती तास 200 किलोमीटर इतकी राहील आणि मुंबई ते नागपूर हे अंतर चार तासात पूर्ण होईल अशी माहिती आहे.
विदर्भाला समृद्धीची वाट दाखवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आता निश्चित झाले आहे. दर पंधरा दिवसांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची नवीन तारीख पे तारीख जाहीर केली जात होती. त्यामुळे जनतेलासुद्धा कंटाळा आला होता. गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्ग उद्घाटनाची किमान १० वेळा तारखा जाहीर झाल्या. मात्र, आता 11 डिसेंबर ही नवी तारीख जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर समृद्धी मार्गाचे उद्घाटन होईल हे देखील स्पष्ट झाले आहे. येत्या 11 तारखेला या मार्गाचे उद्घाटन होत आहे. (PM inaugurate Samriddhi Highway on 11th December) आहे.