नागपूर: महात्मा गांधीच्या बद्दल बोलण्याची संभाजी भिडेंची योग्यता आहे काय, असे देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत असतील तर सरकारने यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे. ते मोकाट फिरता कामा नये. महात्मा गांधींचा अपमान केल्याने आम्हीसुद्धा ठिकठिकाणी यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
आजी-माजी सरकार जबाबदार: पावळ्यात पूर परिस्थिती दरवर्षीच निर्माण होत असली तरी त्याला जबाबदार आताचे आणि मागचे सरकार आहे. दर दोन वर्षांनीच चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी साडेपाचशे कोटीचा प्रस्ताव आम्ही दिला होता. प्रस्तावाच्या माध्यमातून शहरातील दोन्ही मुख्य नद्यांचे खोलीकरण करणार होतो. गाळ काढण्याची आवश्यकता आहे. नालासफाई झालेली नाही. त्यामुळे हा सगळा मनस्ताप चंद्रपूर शहरातील जनतेला सहन करावा लागतो आहे. या पुरात आठशे घरात पाणी गेले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
सरसकट मदत द्या: राज्य सरकारने सरसकट मदत करण्याची गरज आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. म्हणून आता पंचनामे करण्याच्या भानगडीत न पडता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करावी. तरच हा शेतकरी वाचेल असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
भिडेंवर कारवाई करा, अन्यथा: संभाजी भिडे हे सातत्याने महापुरुषांचा अगदी उघडपणे अपमान करत आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात ते आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी मात्र, संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र, आता भिडेंनी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. एवढं होऊन जर संभाजी भिडेंना अटक झाली नाही तर बुधवारी आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. विशेष म्हणजे, संभाजी भिडेंविरुद्ध कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे.
हेही वाचा: