ETV Bharat / state

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; खासगी रूग्णालयात उपचार सुरू - मोहन भागवत लेटेस्ट बातमी

नागपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

corona positive Mohan Bhagwat
मोहन भागवत कोरोना लागण
author img

By

Published : Apr 10, 2021, 10:03 AM IST

Updated : Apr 10, 2021, 12:40 PM IST

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरातील किंग्जवे या खासगी रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. त्यांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मोहन भागवत हे नागपूर येथील संघ मुख्यालयात वास्तव्यास आहेत. त्यांना दोन दिवसांपासून सर्दी आणि खोकला अशी कोरोना सदृश्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. नागपुरातील किंग्जवे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली -

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. नागपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४९ हजार ३४७ सक्रिय रूग्ण आहेत. आज ही रूग्ण संख्या ५० हजारांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Apr 10, 2021, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.