ETV Bharat / state

Mohan Bhagwat on Hinduism : हमास आणि इस्त्रायलसारख्या मुद्द्यावरून देशात कधीही भांडण झालं नाही, कारण...सरसंघचालक भागवत

Mohan Bhagwat Statement : सर्व धर्म, पंथांचा आदर करणारा एक धर्म म्हणजे हिंदू, असे मत राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. ते शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं प्रतापनगर शिक्षण संस्थेच्या प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Mohan Bhagwat Statement
सरसंघचालक मोहन भागवत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 7:25 AM IST

नागपूर Mohan Bhagwat Statement : देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म म्हणजे हिंदू, हा देश हिंदूंचा आहे. सर्वांची काळजी घेणार्‍याला हिंदू असं म्हणतात. तुम्ही युक्रेन युद्ध, हमास आणि इस्रायलमधील युद्धाबद्दल ऐकलच असंल. मात्र आपल्या देशात या अशा मुद्द्यावर कधीही भांडण झालं नाही. अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही, कारण आपण हिंदू आहोत, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं.

शिवरायांच्या जीवनाचे अनुकरण करावे : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन संदेश’ या विषयावर बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन आपण अनुकरण करावं असंच आहे. त्यांचं अनुकरण करणं म्हणजे घोड्यावर बसण्याएवढं सोपं नाही. त्यांनी ज्या गुणांच्या आधारावर कर्तृत्व गाजवलं ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहेत. त्यांना काय करायचं ते स्पष्ट होतं. हा त्यांचा गुण होता. अशक्य काम शक्य करणं हा वारसा शिवाजी महाराजांकडून भारत देशानं घेतलाय. आजच्या पिढीनं शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून त्यांचा वारसा जपण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

...म्हणून आपण हिंदू आहोत : युक्रेन लढाई, हमास युद्ध याप्रमाणं आपल्या देशात लढाई झाली नाही. आपण भांडत नाही म्हणून आपण हिंदू आहोत. खरं तर असा देश असायला हवा, ज्यात आई सुरक्षित राहतील. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजा बनण्याची वेळ आली. तेव्हा प्रजेच्या संरक्षणासाठी ते राजा झाले. आपण एकटे असलो तरी असुरक्षित आहोत. आपल्याला माणसं राखता आली पाहिजे. तेव्हा आपण सुरक्षित असतो, असंही ते म्हणाले.

  • मुस्लिमांशी वैर नव्हतं : पुढं ते म्हणाले की, तेलंगणाचा कुतुबशाह शिवाजी महाराजांना घाबरला होता. शिवाजी महाराज यांचे विदेशी मुस्लिमांशी भांडण होतं. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांशी वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी एक-एक माणूस उभा केला होता. शुद्ध चरित्र संपन्न माणसं शिवाजी महाराज यांनी उभी केली. त्यामुळं त्यांनी उभं केलेलं हे राज्य लोकशाहीचं राहिलं.

हेही वाचा -

  1. Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचा लखनऊ दौरा, आगामी लोकसभेची ठरणार रणनीती?
  2. Dagdusheth Ganpati Procession: 'दगडूशेठ' गणपतीची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, पाहा व्हिडिओ
  3. Mohan Bhagwat On intellectual Kshatriya : 'या' आशेने जग भारताकडे पाहते, मात्र भारताला सध्या बौद्धिक क्षत्रियांची गरज : सरसंघचालक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.