ETV Bharat / state

अन् आरपीएफ जवानांमुळे वाचले दोघांचे प्राण; पाहा व्हिडिओ - आरपीएफ जवानांमुळे वाचले दोघांचे प्राण.

धावत्या रेल्वेत चढण्याचा आणि उतरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका महिला आणि पुरुषाला रेल्वे सुरक्षा पथकाच्या जवानांने वाचवले.

अन् आरपीएफ जवानांमुळे वाचले दोघांचे प्राण

author img

By

Published : Mar 29, 2021, 4:06 PM IST

Updated : Mar 29, 2021, 5:13 PM IST

नागपूर -धावत्या रेल्वे गाडीत चढताना आणि उतरताना गाडीच्या गतीचा अंदाज न आल्याने पाय घसरून पडल्यामुळे दोघांचे जीव धोक्यात आले होते. मात्र, रेल्वे सुरक्षा पथकाच्या जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे दोघांचे प्राण वाचले आहे. या दोन घटना नागपूर आणि वर्धा रेल्वे स्थानाकवर घडल्या आहेत. आरपीएफकडून या दोन्ही घटनांचे व्हिडीओ प्रसारित करण्यात आले आहे. दैव बलवत्तर होते म्हणून या दोन्ही घटनेतील अपघातग्रस्त्यांचे जीव थोडक्यात बचावले आहे.

अन् आरपीएफ जवानांमुळे वाचले दोघांचे प्राण.

हेही वाचा- वाझे प्रकरणातील 'त्या' नंबर प्लेटचे औरंगाबाद कनेक्शन, कॉम्प्युटर-लॅपटॉपही सापडले

पहिली घटना -

पहिली घटना ही नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर घडली आहे. धावती रेल्वे पकडताना पाय घसरल्याने एक प्रवासी थेट फलाट आणि रेल्वेमध्ये अडकून फरफटत जात होता. हे दृश्य नजरेज पडताच स्टेशनवर उपस्थित असेलला एक प्रवासी त्या माणसाच्या दिशेने धावला. लगेचच रेल्वे सुरक्षा पथकाचे जवान संजय खंडारे हे देखील त्या माणसाला वाचवण्यासाठी धावून आले. दोघांनी मिळून त्या प्रवाशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तितक्यात कुणी प्रवाश्याने साखळी ओढून रेल्वे गाडी थांबवली. हा सर्व प्रकार क्षणात घडला. रेल्वे प्रवाश्यांसह आरपीएफ जवनाने वेळेचे भान राखून मदतीसाठी धाव घेतल्याने तो प्रवासी सुखरूप बचावला आहे.

दुसरी घटना -

दुसरी घटना ही वर्धा रेल्वे स्थानकावर घडली आहे. नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेसमधून एक महिला रेल्वेच्या विरुद्ध दिशेने उतरण्याच्या प्रयत्नात असल्याचे रेल्वे सुरक्षा पथकाचे जवान निलेश पिंजारकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्या बोगीकडे धाव घेतली. तोपर्यंत ती महिला फलाटावर कोसळून थेट गाडीच्या खाली जाणार तितक्यात निलेश यांनी महिलेला बाहेर ओढले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या असून दोन्ही घटनांमध्ये आरपीएफच्या जवानांनी प्रसंगावधान राखून दोन प्रवाश्यांचे जीव वाचवले आहे.

हेही वाचा- राज्यात 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 108 मत्यूंची नोंद

Last Updated : Mar 29, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.