ETV Bharat / state

निवासी डॉक्टरांचे आंदोलन अखेर मागे, डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी झाली चर्चा - नागपूर

इंदिरा गांधी रुग्णालयात तथा मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी केलेले सामूहिक रजा आंदोलन अखेर मागे घेण्यात आले होते. यात गुरवारी रात्री महाराष्ट्राचे वैद्यकीय आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

निवासी डॉक्टरांचे आंदोलन अखेर मागे
निवासी डॉक्टरांचे आंदोलन अखेर मागे
author img

By

Published : Jun 5, 2021, 4:25 AM IST

नागपूर - नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णलायत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेले निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यामध्ये लवकरच मेयो रुग्णालयातील 600 बेडेड इमारत नॉन कोविड रुग्णांचा उपचारासाठी सज्ज होणार आहे. सर्जीकल कॉम्प्लेक्समधील कोरोनाबाधित रुग्ण इतरत्र हलवून ही इमारत इतर आजराच्या रुग्णांसाठी खुले करण्याचे लेखी अश्वासनानंतर, निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने हे आंदोलन शुक्रवारी रात्री मागे घेतले आहे.

डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा

इंदिरा गांधी रुग्णालयात तथा मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी केलेले सामूहिक रजा आंदोलन अखेर मागे घेण्यात आले होते. यात गुरवारी रात्री महाराष्ट्राचे वैद्यकीय आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीनंतर हा निर्णय घेतला जाईल, असे अधिष्ठात डॉ. अजय केवलीया यांनी सांगितल्या नंतर दिवसभर आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते. अखेर यात लेखी आश्वासन दिल्याने सामूहिक रजा आंदोलन मागे घेत काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती, मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल यांनी दिली होती.

कोणत्या मागण्या केल्यात मान्य?

सर्जिकल संकुल मधील कोव्हीडचे रुगांना मेयोच्या रुग्णलायत परिसरात असलेल्या ५, ६, आणि २४ क्रमांकाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन कोव्हीड पॉझीटीव्ह रुग्णसुद्धा याच तीन इमारतीत दाखल करण्यात येईल. ३३ कोव्हीड आयसीयुचे अत्यवस्थ रुग्ण सद्यस्थितीत स्थलांतरीत करणे योग्य नसल्याचे सांगून रुग्णसेवेच्या दृष्टीकोनातून ताबडतोब आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यास सांगण्यात आले. दरम्यान सर्जिकल संकुलातील कोव्हीड शस्त्रक्रियागार व लेबर रूम अपघात विभागाच्या वरील तीन इमरजन्सी ओटीमध्ये स्थानांतरीत करण्यात येईल. कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत भविष्यात वाढ झाल्यास सर्जिकल संकुल पुन्हा कोव्हीड रुग्णांसाठी सर्व व्यवस्था पूर्व पदावर वापरण्यात येईल, असेही यामध्ये निवासी डॉक्टरांना सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.