नागपूर - नागपूर जिल्ह्यात आता रुग्णसंख्या सातत्याने घटली आहे. यासोबत गंभीर असलेल्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. सातत्याने घटणारी रुग्णसंख्या आणि मृत्युदर हे दिलासा देणारे ठरत आहे. यात जिल्ह्यात 710 रुग्ण सक्रिय असून केवळ 200 रुग्ण हे दवाखान्यात उपचार घेत आहे. यामुळे 510 रुग्ण घरात राहून उपचार घेत असल्याने परिस्थिती सुधारली आहे. यात रिकव्हरी रेट 97.96 म्हणजे 98 टक्क्यावर आलेला आहे.
रिकव्हरी रेट 98 च्या घरात नागपूर जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालात 7 हजार 041 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 30 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 12 बाधित रुग्णांचा समावेश आहे. तेच मृत्यूच्या दरात घसरण झाली असून ग्रामीण आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या शून्य आहे. शहरात आज 2 मृत्यूची नोंद झालेली आहे. मागील 24 तासात 120 जणांपैकी शहरातील 75 तर ग्रामीणचे 45 जण कोरोना मुक्त झाले आहे. सक्रिय रूग्णांमध्ये 200 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 510 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.
सक्रिय रुग्णसंख्या घटून 710आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्या घटून 710 वर आली आहे. शहरात 647 तर ग्रामीणमध्ये 63 रुग्ण सक्रिय आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 824 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 67 हजार 093 जण हे कोरोनातून बरे झाले आहे. यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 9021 वर जाऊन पोहचली आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट हा 97.96 टक्के इतका आहे.
सहा जिल्ह्यापैकी 3 जिल्ह्यात चौघांचा मृत्यूपूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 224 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 66 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 4 जण हे कोरोनाने दगावले आहे. तेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली या तीन जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद नाही. यात कोरोना बाधितांच्या तुलेनेत 158 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.4 टक्के, तर पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होऊन 0.44 इतकी झाली आहे.
हेही वाचा - पुण्यात 'सॉरी मॉम' लिहून पोलीस शिपायाने हाताची नस कापून घेतला गळफास